आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi (BJP) Vs Nitish Kumar (JDU); Bihar Assembly Election 243 Seats Results 2020

बिहार निवडणूक:20 वर्षानंतर बिहारमध्ये भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत, राज्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता

पाटणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हळु-हळू समोर येत आहेत. हे स्पष्ट आहे आकी, NDA तिसऱ्यांना राज्यात सरकार स्थापन करणार आहे. पण, यावेळेस नीतीश कुमार यांना कमी जागा मिळताना दिसत आहेत. भाजपला बिहारमध्ये 2015 मध्ये मिळाल्या, त्यापेक्षाही जास्त जागा मिळताना दिसत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप 70 ते 80 जागा जिंकू शकतो. 2015 मध्ये भाजपला 53 जागा मिळाल्या होत्या. जदयूला 45 ते 50 जागा मिळू शकतात. पण, यापूर्वीपेक्षा 20-25 जागा कमी होताना दिसत आहेत.

यावरुन स्पष्ट झाले आहे की, राज्यात NDA ची सत्ता येणार आहे. पण, आलेल्या निकालावरुन राज्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये भाजप आणि जदयूची भूमिका आणि मान बदलू शकतो. जदयू बिहारमध्ये आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. जागा वाटपातही जदयूने मोठ्या भावाची भूमिका बजावली होती. नीतीश नेहमी म्हणायचे की, राज्यात आम्ही राजकारण करू, भाजपने केंद्रात राजकारण करावे.

बिहारमध्ये NDA चा प्रवास: 20 वर्षात 4 वेळा भाजपच्या समर्थनामुळे नीतीश मुख्यमंत्री बनले, पण भाजपला लहान भाऊ मानले.

2000: नीतीश कुमार भाजपच्या समर्थनामुळे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले, पण फक्त 7 दिवस पदावर राहिले.

2005: 13 व्या विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. NDA ला 92 जागा मिळाल्या. यात भाजपला 37 आणि जेडीयूला 55 जागा मिळाल्या. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

2005: सहा महिन्यानंतर राज्यात परत निवडणुका झाल्या. यावेळेस NDA ला 143 जागा मिळाल्या. यात जदयूचे 88 आणि भाजपचे 55 आमदार निवडणूक आले. यासोबतच राज्यात नीतीश कुमार मुख्यमंत्री बनले.

2010: NDA ला 243 पैकी 206 जागांवर मोठा विजय मिळाला. यावेळेस जदयूला 115 आणि भाजपला 91 जागा मिळाल्या. नीतीश यांचा मान वाढला. तेव्हापासून जदयू भाजपला लहान भाऊ म्हणू लागले. यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जदयू मोदींमुळे NDA पासून वेगळे झाले.

2015: जदयू आणि भाजपने वेगवेगळी निवडणूक लढवली. यात जदयू-राजद-काँग्रेसच्या महागठबंधनला 126 जागा मिळाल्या. यात जदयूला 71 आणि राजदला 80 जागा मिळू शकल्या. तसेच, भाजपने 53 जागांवर विजय मिळवला. पण, फक्त तीन वर्षानंतर महागठबंधन तुटले.

2020: यावर्षी भाजप आणि जदयूमध्ये 50-50 चा फार्मूला ठरला होता. यात जदयू 122 आणि भाजप 121 जागांवर निवडणूक लढवली. यात भाजपला जदयूपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे, यावेळेस राज्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...