आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Cabinet Expansion LIVE News Update; Jyotiraditya Scindia Sarbananda Sonowal | List Of Ministers In New Cabinet Of Pm Narendra Modi

मोदींचा कॅबिनेट विस्तार:कॅबिनेट विस्तारमध्ये 43 मंत्री घेऊ शकतात शपथ, प्रीतम मुंडे आणि हिना गावित यांची वर्णी लागण्याच्या चर्चा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढच्या वर्षी 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय समीकरणांची दखल घेतली गेली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. आज एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. यापैकी 24 नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

यासह सध्याच्या काही मंत्र्यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबतच महिला व बालविकास मंत्री देबोश्री चौधरी, उर्वरक व रसायन मंत्री सदानंद गौडा आणि कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही राजीनामा घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी मंगळवारीच राजीनामा दिला होता.

असे मानले जात आहे की, या बदलानंतर ही मोदींची सर्वात तरुण आणि प्रतिभावान टीम असेल. मोदींच्या मंत्रिमंडळात सामिल होणाऱ्या मंत्र्यांपैकी 12 अनुसूचित जातींचे, 8 आदिवासी आणि 27 मागासवर्ग असू शकतात. या मंत्रिमंडळाचे चित्रही जवळजवळ स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, अनुप्रिया पटेल, नारायण राणे, हिना गावित, सुनीता दुग्गल, पशुपती पारस, मीनाक्षी लेखी यांच्यासह अनेक नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत.

खरं तर, मोदींचे लक्ष तरुण टीमसह कोरोना महामारी आणि ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेच्या मॅनेजमेंट सुधारण्यावर आहे. पुढच्या वर्षी 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय समीकरणांची दखल घेतली गेली आहे. तरी टॅलेंटचे बॅलेंसही यात ठेवले गेले आहे.

1. ज्योतिरादित्य सिंधिया
2. सर्बानंद सोनोवाल
3. पशुपति नाथ पारस
4. नारायण राणे
5. भूपेंद्र यादव
6. अनुप्रिया पटेल
7. कपिल पाटिल
8. मीनाक्षी लेखी
9. राहुल कसावा
10. अश्विनी वैष्णव
11. शांतनु ठाकुर
12. विनोद सोनकर
13. पंकज चौधरी
14. आरसीपी सिंह (JDU)
15. दिलेश्वर कामत (JDU)
16. चंद्रेश्वर प्रसाद चंद्रवंशी (JDU)
17. रामनाथ ठाकुर (JDU)
18. राजकुमार रंजन
19. बी एल वर्मा
20. अजय मिश्रा
21. अजय भट्ट
22. शोभा करंदलाजे

बातम्या आणखी आहेत...