आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा मेगा कॅबिनेट विस्तार:43 मंत्र्यांची शपथ; 36 नवीन चेहरे, यामध्ये 7 यूपी आणि 3 गुजरातचे जेथे पुढच्या वर्षी निवडणुका, 7 जणांना प्रमोशन, 12 जणांचा राजीनामा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठा कॅबिनेट विस्तार करण्यात आला. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता सर्वार्थ सिद्धि योगात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्या मुहूर्तात, ज्यामध्ये केलेले सर्व काम यशस्वी होतात.

दीड तास चाललेल्या शपथविधीत 36 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. बहुतेक नवीन मंत्री 7 उत्तर प्रदेश आणि त्यानंतर 5 गुजरातचे आहेत. पुढील वर्षी दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्याच्या मंत्र्यांपैकी 7 जणांना बढती देण्यात आली आहे.

मोदींनी यांना केले प्रमोट
अनुराग ठाकूर, जीके रेड्डी, मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाला यांना पदोन्नती मिळाली आहे. हे सर्व 7 राज्यमंत्री होते, त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

यावेळी सर्वाधिक महिला

शपथ घेणाऱ्या 28 राज्य मंत्र्यांमध्ये सात महिला आहेत. मोदींच्या 8 वर्षांच्या कार्यकाळात यावेळी सर्वात जास्त मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात 7 आणि 2019 मध्ये 6 महिला मंत्री होत्या. यानंतर हरसिमरत सिंह कौर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावर्षी सर्वाधिक 11 महिला मंत्र्यांचा समावेश आहे.

सर्वप्रथम राणेंनी घेतली शपथ

सर्वप्रथम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील भाजप खासदार नारायण राणे यांना शपथ दिली. यानंतर आसामच्या सरबानंद सोनोवाल यांनी शपथ घेतली. त्यानंतर मध्य प्रदेशच्या विरेंद्र कुमार खटीक यांनी शपथ घेतली. त्यांना मध्य भारताचा दलित चेहरा असलेले ठावरचंद गहलोत यांच्या जागी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले.

महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश

 1. नारायण राणे
 2. भागवत कराड
 3. भारती पवार
 4. कपिल पाटील

मध्य प्रदेशातूनच ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्र्यांची शपथ दिली गेली. त्यांच्या आधी शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रपतींना नमस्कार केला, पण सिंधिया तसे करण्यास विसरले आणि थेट त्यांच्या खुर्चीवर बसले. जेव्हा कुणीतरी आठवण करुन दिली, तेव्हा ते परत आले आणि त्यांनी राष्ट्रपतींना अभिवादन केले.

77 मंत्र्यांचे जातिय गणित

 • 8 राज्यांमधून 12 दलित मंत्री
 • 8 राज्यांमधून 8 अदिवासी मंत्री
 • 15 राज्यांतून 27 ओबीसी मंत्री
 • 5 राज्यांमधून 5 अल्पसंख्यक मंत्री

हे बनले कॅबिनेट मंत्री
1. नारायण राणे

2. सर्बानंद सोनोवाल

3. वीरेंद्र कुमार

4. ज्योतिरादित्य सिंधिया

5. आरसीपी सिंह

6. अश्विनी वैष्णव

7. पशुपति कुमार पारस

8. किरण रिजिजू

9. राजकुमार सिंह

10. हरदीप सिंह पुरी

11. मनसुख मंडाविया

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची नावे

 1. सदानंद गौड़ा
 2. रविशंकर प्रसाद
 3. थावर चंद गहलोत
 4. रमेश पोखरियाल निशंक
 5. हर्षवर्धन
 6. प्रकाश जावडेकर
 7. संतोष कुमार गंगवार
 8. बाबुल सुप्रियो
 9. संजय धोत्रे
 10. रत्तन लाल कटारिया
 11. प्रताप चंद सारंगी
 12. देबोश्री चौधरी
बातम्या आणखी आहेत...