आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi CBSE Meeting Update | PM Modi Meeting, Class 12 Board Examinations, CBSE Class 12 Board Examinations 2021, ICSE Class 12 Board Examinations 2021, PM Modi

सीबीएसई 12वीची परीक्षा रद्द:मुलांनो..! तुमचे जीवन अनमोल आहे...परीक्षा नव्हे, आता 10वी बोर्ड, 11वी अणि 12वीचे अंतर्गत मूल्यांकन ठरू शकते निकालाचा आधार

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वीलेखक: अनिरुद्ध शर्मा
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांसमोर सर्व पर्याय ठेवण्यात आले

कोरोना संसर्ग पाहता केंद्र सरकारने सीबीएसई १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता निकाल कसा जाहीर करायचा, याचा निर्णय मात्र अजून झालेला नाही. परंतु, बैठकीनंतर सांगण्यात आले की, सीबीएसई एक सुनियोजित व्याख्येनुसार कालबद्ध पद्धतीने १२वीचा निकाल जाहीर करेल. अर्थात, तज्ज्ञांनुसार, विद्यार्थ्यांच्या दहावी बोर्डाचा निकाल, ११वी आणि १२वी वर्गातील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण दिले जाऊ शकतात. सीबीएसई अशा मूल्यमापनासाठी शक्यतो याबाबतचे सूत्र एक-दोन दिवसांत जाहीर करण्याची शक्यता आहे.

सीबीएसई 12वीची परीक्षा रद्द
विद्यार्थ्यांच्या हितासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुले, त्यांचे आई-वडील, पालक आणि शिक्षकांच्या मनातील शंका दूर करणे गरजेचे आहे. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला आम्ही महत्त्व दिले. मुलांच्या आरोग्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा तणावात मुलांना परीक्षा देण्याचे बंधन घालणे चुकीचे आहे. या प्रक्रियेशी संबंधित सर्वांनीच मुले व पालक तसेच शिक्षकांबद्दल संवेदनशील असायला हवे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी (आढावा बैठकीनंतरचे वक्तव्य)

राज्य मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द केली जाणार
सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयापाठोपाठ राज्य मंडळाच्या १२ वी परीक्षासुद्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी दिले असून दोन दिवसांत याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.

गायकवाड यांनी सीबीएसईच्या १२ वी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे आज स्वागत केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी घेतलेल्या बैठकीतही गायकवाड यांनी अशीच मागणी केली होती.

महत्त्वाचा प्रश्न...१२वीच्या मुलांना विषयांचे गुण कसे मिळतील?
मूल्यांकनाचे सूत्र दिले नाही... परंतु तार्किकदृष्ट्या ११वी-१२वीच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण मिळतील
सीबीएसईच्या सूत्रात विद्यार्थ्यांच्या १०वी व ११वीच्या निकालाशिवाय १२वीच्या अंतर्गत मूल्यांकनासारख्या निकषांचाही समावेश होऊ शकतो.
- १२वीच्या विद्यार्थ्यांनी १०वीमध्ये बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यामुळे ते निकाल १२वीचा निकाल निश्चित करण्यासाठी आधार ठरू शकतो.
- सोबत ११वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी १२वीच्या विषयांचीच परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे ११वीचा निकाल आधार ठरू शकतो.
- १२वीच्या विद्यार्थ्यांचे बोर्डपूर्व आणि इतर अंतर्गत मूल्यांकनाचे निकाल तयार करण्यासाठी मुख्य मापदंड ठरू शकतो.
- १०वीच्या निकालाचे सूत्रही विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनासाठी व बोर्डपूर्व निकालांसाठी मानक ग्राह्य धरले आहे.
- सीआयएससीईने म्हटले आहे की, यंदाच्या निकालांत १२वीच्या अंतर्गत मूल्यांकनाला सर्वाधिक महत्त्व असेल.

बातम्या आणखी आहेत...