आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi; Central Vista Project Update | Prime Minister's New Residence, Bombey High Court, Allahabad High Court, Vaccination In UP, Oxygen Plant In Maharashtra

व्हिस्टा प्रकल्पाच्या बचावात सरकार:मजुरांचा विमा काढलाय, ते संचारबंदीच्या आधीपासूनच काम करत आहेत! केंद्र सरकारने बांधकाम सुरू ठेवण्याचे हायकोर्टात दिले स्पष्टीकरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवीन संसदेच्या इमारतीचा विरोध

वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर स्थगिती लावण्याच्या मागणीच्या याचिकेवर मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. केंद्राने या प्रकल्पाच्या बांधकामाचा बचाव केला आहे. केंद्राने सांगितले की कर्फ्यूपूर्वीच कामगार कामात गुंतले होते. सर्वांचा आरोग्य विमा आहे आणि बांधकाम साइटवर कोविड सुविधा देखील आहे.

खोट्या कारणावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे केंद्राने म्हटले आहे. या प्रकरणी आता बुधवारी कोर्टाची सुनावणी होणार आहे. यापूर्वी असा एक अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. SC ने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

या प्रकरणांव्यतिरिक्त, ऑक्सिजन प्लांट, लसीकरणाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी आज देशातील अन्य दोन उच्च न्यायालयात होणार आहे. महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या बांधकामासंदर्भात निर्देश दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय त्याकरिता लागणाऱ्या जागे व त्यावरील खर्चासंदर्भात सुनावणी करेल. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लसीकरण कसे केले जाईल? या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात होईल.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवीन संसदेच्या इमारतीचा विरोध
नवीन संसद भवन, सरकारी कार्यालय आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या निर्मितीला विरोधी पक्ष विरोध करत आहेत. सोशल मीडियावरील लोकांनीही या महामारी काळात हे थांबवावे, असे सांगत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. यावेळी लोकांच्या मते हॉस्पिटलची समस्या आहे. ऑक्सिजन, लस आणि औषधांची कमतरता आहे.

या योजनेनुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत सरकारी इमारती आणि काही घरे बांधली जाणार आहेत. यासाठी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत चार किलोमीटरचा परिसर निवडला गेला होता. अलीकडेच राहुल गांधी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प अनावश्यक असल्याचे म्हटले होते.

काय आहे सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट?
राष्ट्रपती भवन, विद्यमान संसद भवन, इंडिया गेट आणि राष्ट्रीय अभिलेखागार इमारत तशीच ठेवली जाईल. सेंट्रल व्हिस्टाच्या मास्टर प्लॅननुसार, नवीन त्रिकोण संसद भवन जुन्या गोलाकार संसद भवनासमोर गांधीजींच्या पुतळ्याच्या मागे तयार केले जाईल. ते 13 एकर जागेवर बांधले जाईल. या जागेवर आता एक उद्यान, तात्पुरते बांधकाम आणि पार्किंग आहे. नवीन संसद भवनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांसाठी प्रत्येकी एक इमारत असेल, परंतु मध्यवर्ती सभागृह बांधले जाणार नाही.

15 एकरांवर नवीन पीएम आवास बांधले जाईल
मंत्रालयांचे सामायिक केंद्रीय सचिवालय तयार करण्यासाठी शास्त्री भवन, उद्योग भवन, निर्माण भवन, कृषी भवन आणि इतर अनेक इमारतीही पाडल्या जातील. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पातील CPWD (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग) च्या अलिकडील प्रस्तावानुसार पंतप्रधानांच्या नवीन निवासी संकुलात 10 चार मजली इमारती असतील. पंतप्रधानांचे नवीन निवासस्थान 15 एकर जागेवर बांधले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...