आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Comment On Sharad Pawar Over Farmer Protest; "Sharad Pawar And Many Other Leaders Are In Favor Of New Farmer Law, But Some Have Taken A U turn For Politics" Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांना टोला:'शरद पवारांसह अनेक नेते कृषी सुधारणांच्या बाजूने, पण काहींनी राजकारणासाठी यूटर्न घेतला'- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी संघटनांना मोदींचे अपील- आंदोलन मागे घ्या, सोबत मिळून चर्चा करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी मोदींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही मोदींनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'शरद पवार कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला', असे मोदी म्हणाले.

यावेळी मोदी म्हणाले की, 'आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचे सांगितले. काँग्रेससह अनेक नेत्यांनीही कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचे सांगितले होते. आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले. कृषी कायद्याबाबत माझे म्हणणे नका ऐकू, पण किमान मनमोहन सिंग यांचे तरी म्हणणे ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा', असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

शेतकरी संघटनांना अपील-आंदोलन संपवून चर्चा करा

यावेळी मोदींनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अपील केली की, आंदोलनस्थील वृद्ध लोकही बसले आहेत. त्यांचाही विचार करा आणि आंदोलन संपवा. आपण सोबत मिळून चर्चा करू आणि मार्ग काढू. काही सुधारणा करण्यासाठी आम्हाला संधी द्या. याशिवाय मोदी म्हणाले की, सभागृहाची पवित्रता समजून घ्या. ज्या 80 कोटी लोकांना स्वस्त धान्य मिळते, ते सुरूच राहील. लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी होत आहे. आपल्याला असे काही करायचे आहे की, शेतकऱ्यांवर सर्व भार पडता कामा नये. आपण, राजकारणात अडकलोत, तर काहीच होणार नाही.