आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी 11.05 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सीनेशनची सुरुवात केली. यापूर्वी 35 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटले की, कोरोनाची व्हॅक्सीन खूप कमी वेळात आली आहे. जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू होत आहे. यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो.देशाला संबोधीत करत असताना मोदी भावुक झाले. ते म्हणाले की, आपल्याला वाचवण्यासाठी अनेक लोकांनी प्राण संकटात टाकले आहे. अने लोक घरी परतले नाहीत. आसा आरोग्य सेवेसंबंधीत लोकांना लस देऊन समाज आपले ऋण फेडत आहे.
सर्व 29 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या 3006 साइट्सवर एकाच वेळी हा कार्यक्रम सुरु असेल. पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस दिली जाईल. पहिल्या दिवशी प्रत्येक साइटवर कमीत कमी 100 लोकांना लस दिली जाईल.
मोदींच्या भाषणातील प्रमुख गोष्टी
व्हॅक्सीन बनवणाऱ्यांना शुभेच्छा
कित्येक महिन्यांपासून, देशातील प्रत्येक घरातील मुले आणि वृद्ध लोकांच्या तोंडात एकच प्रश्न होता, कोरोनाची लस कधी येईल? तर आता कोरोनाची लस आली आहे. लस तयार करण्याशी संबंधीत वैज्ञानिक हे आभारास पात्र आहेत. त्यांनी ना सण पाहिला न दिवस पाहिला, न रात्र पाहिली. एवढ्या कमी दिवसांमध्ये एक नाही तर दोन दोन मेड इन इंडिया व्हॅक्सीन तयार झाल्या आहेत. अशा कर्तृत्त्वांसाठी राष्ट्रीय कवी रामधारीसिंग जी दिनकर म्हणाले होते की, 'मानव जब जोर लगाता है, पत्थर पानी बन जाता है।'
ज्यांना जास्त रिस्क, त्यांना आधी लस
भारताचे लसीकरण अभियान खूप मानवीकरणावर आधारित आहे. ज्यांना कोरोना संक्रमणाची रिस्क सर्वात जास्त आहे त्यांना लस पहिले मिळेल. जे रुग्णालयाचे स्टाफ आहेत त्यांना कोरोनाची व्हॅक्सीन पहिले मिळेल. यानंतर अशा लोकांना लस दिली जाईल ज्यांच्यावर देशाची सुरक्षा किंवा कायदा-व्यवस्थेची जबाबदारी आहे. सुरक्षादल, पोलिस, फायर ब्रिगेड आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. यांची संख्या जवळपास 3 कोटी आहे. यांच्या व्हॅक्सीनेशनचा खर्च भारत सरकार उचलेल.
दुसरा डोज खूप आवश्यक
पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस कधी दिली जाणार याची माहिती तुम्हाला फोनवर दिली जाईल. व्हॅक्सीनचे दोन डोज घेणे खूप आवश्यक आहे. एक डोज घेतला आणि दुसरा डोज विसरला अशी चूक करु नका. पहिल्या आणि दुसऱ्या डोजमध्ये जवळपास एका महिन्याचे अंतर ठेवले जाईल. दुसरा डोज घेतल्यानंतर तुमच्या शरीरात कोरोनाविरोधात शक्ती विकसित होऊ शकतील. व्हॅक्सीन घेताच बेसावध राहू नका. ज्या धैर्याने कोरोनाचा सामना केला, तसेच धैर्य व्हॅक्सीनेशनच्या वेळी दाखवायचे आहे.
ऐतिहासिक लसीकरण
इतिहासात एवढे मोठे लसीकरण अभियान अद्यापही चालवण्यात आलेले नाही. भारत पहिल्याच टप्प्यात 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना लस देत आहे. तर जगातील 100 पेक्षा जास्त देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे. आपण दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाचे लक्ष्य 30 कोटींपर्यंत घेऊन जाईल. जगात एवढी लोकसंख्या असणारे तीन देश चीन, भारत आणि अमेरिका आहे. यामुळे हे ऐतिहासिक लसीकरण आहे.
प्रोपोगंडापासून दूर राहा
तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रोपोगंडा किंवा दुष्प्रचारापासून दूर राहायचे आहे. आपल्या वैज्ञानिकांच्या जगतामध्ये खूप विश्वसनीयता आहे. आम्ही हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डने मिळवला आहे. तुम्हाला खूप अभिमान वाटेल की, जगात जेवढ्या मुलांना जीवनरक्षक लस दिल्या जातात त्यामधून 60% भारतात तयार होतात.
#WATCH | Health workers clap and cheer as COVID-19 vaccine reaches the vaccination centre at Cooper hospital in Mumbai, Maharashtra. pic.twitter.com/QOp2X15Cs8
— ANI (@ANI) January 16, 2021
महाराष्ट्रात सर्वात जास्त वर्कर्सला लस देणार
राज्य | किती केंद्र | लस |
महाराष्ट्र | 210 | 24,479 |
राजस्थान | 161 | 23,591 |
तामिळनाडू | 230 | 22,071 |
प. बंगाल | 224 | 21,950 |
गुजरात | 160 | 20,950 |
उत्तर प्रदेश | 170 | 18,155 |
बिहार | 167 | 18,021 |
आंध्र प्रदेश | 178 | 17,850 |
कर्नाटक | 152 | 15,809 |
मध्य प्रदेश | 150 | 15,000 |
प्रश्नोत्तरामध्ये जाणून घ्या कोणत्या लोकांना दिली जाणार लस
प्रथम लस कोणाला मिळेल?
आजपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्यसेवा कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाइन वर्कर्सला फ्रीमध्ये लस दिली जाईल. हेल्थकेअर कर्मचार्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, ANM सारख्या आरोग्याशी संबंधित लोकांचा समावेश आहे. तसेच फ्रंटलाइन कर्मचार्यांमध्ये स्वच्छता कामगार, पोलिस, होमगार्ड आणि जवानांचा समावेश आहे.
दुसऱ्या फेसमध्ये ऑगस्टपर्यंत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि गंभी आजारांचा सामना करणाऱ्या 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लस दिली जाईल. अशाच प्रकारे हायरिस्क असणाऱ्या जवळपास 27 कोटी लोकांना लस दिली जाईल.
कोणती व्हॅक्सीन दिली जाईल?
3 जानेवारी रोजी सरकारने दोन लसींना मान्यता दिली आहे. पहिली कोव्हॅक्सीन - ही स्वदेशी लस आहे, जी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी बनवली आहे. दुसरी कोव्हशील्ड - ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका कंपनीने मिळून तयार केली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) ही लस बनवत आहे. लसीकरणात सामील असलेल्यांना स्वतःच्या आवडीची लस घेण्याचा पर्याय मिळणार नाही.
लसीकरण कसे कार्य करेल?
भारताची लोकसंख्या जवळपास 130 कोटी आहे. आपल्याकडे अशा मोठ्या देशात निवडणुका घेण्याचा अनुभव आहे, त्यामुळे लसीकरण कार्यक्रमही त्याच धर्तीवर चालवला जाईल. गृहनिर्माण मंत्रालयाने निवडणूक आयोगाला लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांची लेटेस्ट यादी शेअर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून प्रायोरिटीच्या आधारे लोकांचा शोध घेण्यात येईल.
व्हॅक्सीनेशन किती वाजता सुरू होईल? कोणत्या वयाच्या लोकांना लस दिली जाईल
व्हॅक्सीनेशन सेशल 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल. जे लोक 5 वाजेपर्यंत येतील त्यांना त्याच दिवशी लस दिली जाईल. प्रत्येक साइटवर 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना लस दिली जाईल. साइटवर असलेल्या कर्मचाऱ्यांजवळ लाभार्थ्यांची 3 हार्ड कॉपी अेल. व्हॅक्सीन घेणाऱ्याचे नाव Co-WIN अॅपवरही अपलोड होतील. शनिवारी व्हॅक्सीन घेणाऱ्यांची नावे तीन दिवसांपूर्वी अपलोड केलेले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.