आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टला (NGMA) भेट दिली. येथील जनशक्ती प्रदर्शनात त्यांनी कलाकारांनी तयार केलेल्या विविध कलाकृती पाहून त्यांच्या कलेचे कौतुक केले.
पीएम मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 100 व्या भागानिमित्त आर्ट गॅलरीमध्ये 'जनशक्ती' नामक हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ते विख्यात क्युरेटर अलका पांडे यांनी आयोजित केले होते. या प्रदर्शनातील कलाकृती तयार करण्यासाठी कलाकारांनी छायाचित्रे, शिल्पे, छायाचित्रण व नवीन माध्यमांचा वापर केला.
पीएम मोदींनी कलाकृती आवडीने पाहिली...
या प्रदर्शनात स्वच्छता, जलसंधारण, कृषी, अंतराळ, ईशान्य भारतातील राज्ये, महिला शक्ती व योग, आयुर्वेद सारख्या मन की बातमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या विविध विषयांशी संबंधित चित्रे व कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. जनशक्तीसाठी योगदान देणाऱ्या कलाकारांमध्ये मनू व माधवी पारेख, अतुल डोडिया, परेश मैती, इराण्णा जीआर, जगन्नाथ पांडा व इतरांचा समावेश आहे.
शेवटी, पंतप्रधानांनी जनशक्ती प्रदर्शनाच्या कॅटलॉगवर स्वाक्षरी केली. तसेच 'मन मंदिराचा प्रवास सुखकर होवो' असा संदेश लिहिला. या कॅटलॉगवर 13 कलाकारांचीही स्वाक्षरी आहे.
मोदींशी संबंधित खालील बातमी वाचा...
UN मुख्यालयातही ‘मन की बात’चे प्रसारण होणार:100 वा भाग ऐतिहासिक क्षण-भारतीय दुतावास, बिल गेटस यांच्याकडून मोदींचे अभिनंदन
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारीत होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयातही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारतीय मिशनने यासंदर्भात एक ट्विट करत लिहिले आहे की, 'ऐतिहासिक क्षणासाठी तयार व्हा. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या ट्रस्टी कौन्सिल चेंबरमध्ये याचे थेट प्रक्षेपण होईल.'
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस यांनीही मन की बातसाठी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले- मन की बातने स्वच्छता, आरोग्य, महिला सशक्तिकरण आणि विकासाच्या अनेक मुद्द्यांना महत्व दिले आहे. यामुळे आज अनेक समुदायाचे लोक पुढे येत यावर काम करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.