आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi DM Meeting Update; CoronaVirus News | PM Modi To Interact With District Magistrate Of 100 Districts

पंतप्रधानांची अधिकाऱ्यांसोबत बैठक:आव्हाने कितीही असली तरी आपली इच्छाशक्ती त्याहून मोठी! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना उपदेश, धोरणांबाबत दिली खुली सूट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारची धोरणे जिल्हास्तरावर उपयोगी नसतील तर नवीन प्रयोग करा -पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कोरोनाशी दोन हात करताना येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाविरुद्धच्या युद्धात विभागीय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. तुम्हीच युद्धाचे कमांडर आहात अशा शब्दांत मोदींनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. कुठल्याही युद्धात कमांडर योजनांना मूर्त स्वरूप देतात. लढा देतात आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतात. तुम्ही भारताच्या लढ्यात महत्वाचे फील्ड कमांडर आहात असेही मोदी म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत 20 मे रोजी करणार चर्चा
कोरोना व्हायरसच्या विरोधात लोकल कंटेनमेंट झोन, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवणे हीच एक प्रकारची शस्त्रे आहेत. रुग्णालयात बेड किती आहेत याची माहिती जारी केल्याने लोकांची सोय होते. काळाबाजार रोखण्यात मदत मिळते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, बैठकीत कर्नाटक, बिहार, आसाम, चंदीगड, तामिलनाडू, उत्तराखंड, मध्यप्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान 20 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहेत. यात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 54 जिल्हाधिकारी सहभागी होतील असे पीएमओच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे

1. प्रत्येक जिल्ह्यात वेगळे आव्हान
सर्वांना माझी विनंती आहे की आपण केलेल्या चांगल्या कामांची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवा. जेणेकरून मी ते इतर ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न करेल. हे देशाच्या कामी येईल. तुमच्या कामांचे कौतुकच करावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात वेग-वेगळे आव्हान आहे.

2. कोरोनाला गावांपासून दूर ठेवा
जिल्ह्यातील आव्हानांना कसे सामारो जावे हे आपल्याला माहिती आहे. जिल्ह्याला यश मिळण्यात देशाचे यश आहे. त्यामुळेच आपण गावांना कोरोनापासून मुक्त ठेवू. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये असा संकल्प गावकऱ्यांनी करावा.

3. धोरणांबाबत खुली सूट
सरकारने बनवलेले धोरण जिल्हा पातळीवर उपयोगी नसल्याचे वाटल्यास जिल्ह्याला बळकटी देणारे धोरण बनवण्याची तुम्हाला खुली सूट आहे. यात नवीन प्रयोग सुद्धा करू शकता. हे नवीन प्रयोग राज्य किंवा देशासाठी उपयोगी असल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवा. सरकारच्या धोरणात बदल करण्याच्या सूचना असतील तर त्या देखील पाठवा.

4. अधिक सतर्क राहण्याची गरज
असेही काही जिल्हे असतील ज्या ठिकाणी कोरोनाचे पीक आल्यानंतर प्रकरणे कमी झाली. त्यांच्या अनुभवातून काही शिकता येईल. त्यांच्या व्यूहरचनेतून कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत होईल. आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.

5. प्रत्येक आयुष्य वाचवणे आपली जबाबदारी
वर्षभरापासून बैठका घेत आहे. त्या प्रत्येक बैठकीत प्रत्येक आयुष्य वाचवणे आणि कोरोना रोखणे आपली जबाबदारी आहे असे म्हटले आहे. असे करण्यासाठी संक्रमणाबाबत खरी माहिती जारी करावी. ट्रॅकिंग, ट्रेसिंग, उपचार आणि कोविड बिहेवियर वर लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागांत कोरोना उपचारावर जनजागृती आवश्यक आहे.

6. गरीबांचा त्रास कमी व्हावा
समाजातील अगदी खालच्या स्तरापर्यंत मदत पोहोचायला हवी. गरीबांना मदत मिळेल अशी यंत्रणा उभारावी. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना प्रशासनाने ऑक्सीमीटर आणि औषधी दिल्यास त्यांना बळ मिळते. प्रत्येक नागरिकाच्या ईज ऑफ लिविंगचा विचार करा. संक्रमण थांबवायचे आहे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील सुरळीत सुरू ठेवायचा आहे. गरीबांचे त्रास कमी व्हावे.

7. व्हॅक्सीनेशन या लढ्याचे सशक्त माध्यम
रुग्णालयात पर्यवेक्षण समिती जेवढे चांगले काम करेल तितका ऑक्सिजनचा योग्य वापर होईल. लसीकरण कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक सशक्त माध्यम आहे. यासंदर्भात उठलेल्या भ्रमांना निरस्त करायला हवे. जिल्हा स्तरावर लसींचा पुरवठा वाढवावा. राज्यांना 15 दिवसांच्या आगाऊ लस देण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत असेही पंतप्रधान म्हणाले.

8. आव्हानापेक्षा आपली इच्छाशक्ती मोठी
पावसाळ्यात आव्हाने आणखी वाढतील. अशात झपाट्याने कामे करणे आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यास अडचणी येऊ शकतात. आव्हाने कितीही असली तरीही आपली इच्छाशक्ती मोठी आहे असे पंतप्रधान म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...