आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्य काळ पूर्ण झाला आहे. त्यांच्यासोबत शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी म्हणाले की, या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचे काम केले.
यावेळी राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या सोबत असलेल्या आपल्या मैत्रीचा उल्लेख केला. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना मोदी अनेकदा रडले, अश्रू पुसले आणि म्हणाले- आझादजी त्यावेळेस कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे चिंता करायचे.
मोदी पुढे म्हणाले की, 'एकदा मी आणि गुलाम नबी आझाद लॉबीमध्ये बातचीत करत होतो. बाहेरुन पत्रकार हे सर्व पाहत होते, बाहेर गेल्यावर पत्रकारांनी आझाद यांना घेरले आणि आमच्या बातचीतविषयी विचारले. त्यावर गुलाम नबी आझाद म्हणाले की, आम्ही वाद-विवाद करत होतो. हे आमचे कुटुंब आहे आणि आम्ही आमचे सुख-दुःख वाटतो. गुलाम नबीजी यांनी आपल्या बंगल्यात जी बाग बनवली आहे, ती काश्मीरमधील घाटीची आठवण करुन देते.'
मोदींनी यावेळी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला, ज्यात गुजरात मधील लोकांचा मृत्यू झाला होता. मोदी म्हणाले की, 'त्या हल्ल्यानंतर सर्वात आधी माझ्याकडे गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हता. फोनवर त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळेस प्रणब मुखर्जीजी संरक्षण मंत्री होते. मी त्यांना विनंती केली की, मृतदेह आणण्यासाठी विमानाची गरज आह. ते म्हणाले की, मी व्यवस्था करतो. त्यानंतर रात्री परत एकदा आझाद जी यांचा फोन आला होता आणि कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे चिंता करत होते. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्यांना गुलाम नबी आझाद यांनी त्या पदाला दिलेली उंची गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील. गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या पक्षासोबत देशाची आणि राज्यसभेची काळजी असायची', असं मोदी म्हणाले.'
काल दिसले होता पंतप्रधानांचे वेगळे रुप
सोमवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधानांचे वेगळे रुप पाहायला मिळाले होते. काल त्यांनी- आंदोलनजीवी, फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी आणि जी-23, अशा शब्दांचा उल्लेख केला होता. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांवर टोकी करताना चार माजी पंतप्रधानांचाही उल्लेख केला.
मोदी म्हणाले होते की, ‘आपल्याला काही शब्द माहित होते. जसे, श्रमजीवी, बुद्धिजीवी. मी पाहत आहे, मागील काही दिवसांपासून आंदोलनजीवी नावाची नवी जमात तयार झाली आहे. आंदोलन कोणाचेही असो, प्रत्येक आंदोलनात हे लोक दिसतात.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.