आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाची गती वाढणार:पुढील 15 दिवसात केंद्रसरकार राज्यांना 1.92 कोटी डोस पाठवणार, यामध्ये 1.62 कोटी कोविशील्ड आणि 24.49 लाख कोव्हॅक्सिन

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने राज्यांना व्हॅक्सिन पुरवण्याची मोहीम तीव्र केली आहे. केंद्रातर्फे येत्या 15 दिवसांत 1.92 कोटी लस डोस राज्यांना पाठविण्याची तयारी सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या लसीचे डोस 16 मे ते 31 मे दरम्यान पाठवले जातील. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या जाणार्‍या एकूण डोसपैकी 1.62 कोटी डोस कोविशील्ड आणि 24.49 लाख डोस कोव्हॅक्सिनचे असतील. सर्व डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य मिळतील.

लस घेण्याचे आवाहन
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पुन्हा एकदा लोकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच माेदींनी या संकटाच्या काळात राज्यांना काेराेनाच्या औषध व उपकरणांच्या काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...