आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi High Level Meeting | PM Modi Meeting, Corona High Level Meeting, Cabinet Secretary, Principal Secretary To PM, Health Secretary, Dr Vinod Paul, Corona Cases In India

कोरोनावर उच्चस्तरीय बैठक:पंतप्रधान मोदी कोरोना आणि लसीकरणाचा आढावा घेत आहेत; प्रिंसिपल सेक्रेटरीसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात गेल्या 24 तासात 93,249 नवीन संक्रमित आढळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कोरोना आणि लसीकरणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव डॉ. विनोद पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. काल (शनिवारी) कोरोना रुग्णांनी 93 हजारांचा आकडा पार केला आहे, यानंतर पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलावली आहे.

आतापर्यंत 1.24 कोटी संक्रमित
भारतात गेल्या 24 तासात 93,249 नवीन संक्रमित आढळले. यासोबतच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या 1 कोटी 24 लाख 85 हजार 509 झाली आहे. 513 नव्या मृतांनंतर एकूण मृतांची संख्या आता 1 लाख 64 हजार 623 झाली आहे. देशात सक्रिय प्रकरणाची एकूण संख्या 6 लाख 91 हजार 597 आहे आणि 1 कोटी 16 लाख 29 हजार 289 लोक बरेही झाले आहेत.

आतापर्यंत 24.81 कोटी टेस्ट करण्यात आल्या
देशभरात आतापर्यंत कोरोनासाठी 24 कोटी 81 लाख 25 हजार 980 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 एप्रिलला केलेल्या 11 लाख 66 हजार 716 टेस्टचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...