आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi In Mann Ki Baat | Mann Ki Baat, Coronavirus Second Wave In India, Farmers Protest, Corona Vaccine, Corona Cases, Oxygen Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींची 'मन की बात':पंतप्रधान म्हणाले - व्हॅक्सीनचे महत्त्व सर्वांना समजत आहे, याविषयी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत सरकारकडून मोफत व्हॅक्सीन कार्यक्रम पुढेही सुरुच राहिल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी रेडियो कार्यक्रम मन की बातच्या 76 व्या एपिसोड दरम्यान देशाला संबोधित केले. या दरम्यान त्यांनी म्हटले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान व्हॅक्सीनचे महत्त्व सर्वांना समजले आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. भारत सरकारकडून सर्व राज्य सरकारांना फ्री व्हॅक्सीन पाठवली गेली आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक याचा लाभ घेऊ शकता. एक मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही लस दिली जाईल.

त्यांनी स्पष्ट केले की, भारत सरकारकडून मोफत व्हॅक्सीन कार्यक्रम पुढेही सुरुच राहिल. माझी राज्यांना विनंती आहे की, त्यांनी भारत सरकारच्या मोफत व्हॅक्सीन अभियानचा लाभ जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचवावा.

कोरोना आणि व्हॅक्सीनेशनवर डॉक्टरांसोबत चर्चा
सर्वात पहिले मोदींनी मुंबईच्या डॉ. शशांक यांच्यासोबत चर्चा केली. या दरम्यान डॉ. शशांक यांनी सांगितले की, लोक खूप उशीरा ट्रीटमेंट सुरू करतात. सरकारी सूचनांचे पालन केले तर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सौम्य कोविडसाठी आम्ही ऑक्सिजन मॉनिटर करतो, ताप पाहतो. ताप वाढल्यावर पॅरासिटामॉल देतो. मध्यम कोविडमध्ये डॉक्टरांसोबत संपर्क आवश्यक आहे. योग्य आणि स्वस्त औषध घेतले पाहिजे. ऑक्सिजनही द्यावे लागते. असे होतेय की, रेमडेसिविर आहे, यामुळे रुग्णालयात कमी दिवस राहावे लागत आहे. याच्या सुरुवातीच्या वापराने फायदा आहे, मात्र यामागे पळू नये. डॉक्टरांनी सांगितले तरच घ्यावे. प्राणायामने जास्त फायदा होईल. रक्त पातळ करणाऱ्या इंजेक्शनने लोक बरे होतात. सल्ला घेणे आवश्यक आहे. महागड्या औषधांच्या मागे पळणे आवश्यक नाही.

यानंतर मोदींनी डॉ. नाबिद यांच्यासोबत चर्चा केली. या दरम्यान नाबिद म्हणाले की, भीतीचे वातावरण होते, कोविडला मृत्यूच मानले जात होते. रुग्णालयातील स्टाफमध्येही भीतीचे वातावरण होते. वेळ गेल्यानंतर आम्ही पाहिले की, प्रोटेक्टिव्ह गियर आणि सावधानी बाळगल्यास सर्व सुरक्षित राहू शकतात. आम्ही पाहिले की, 90-95% रुग्ण विना औषधांचे बरे होत आहे. दुसऱ्या लाटेमध्येही पॅनिक होण्याची गरज नाही. प्रोटेक्टिव्ह मार्ग आणि प्रोटोकॉलचे पालन केले तर सुरक्षित राहू शकता. मास्क घाला, सोशल डिस्टेंसिंग ठेवा. आपल्याकडे दोन व्हॅक्सीन कोव्हॅक्सिन आणि कोवीशिल्ड आहे. जम्मू-कश्मीरविषयी बोलायचे झाले तर येथे 15-16 लाख लोकांनी लस घेतली आहे. सोशल मीडियावर साइड इफेक्टविषयी भ्रम होता. अजुनपर्यंत आम्हाला हे दिसलेले नाहीत. व्हॅक्सीन घेतल्यानंतर ताप वगैरे येणे हे सामान्य आहे. व्हॅक्सीननंतर लोक पॉझिटिव्ह होऊ शकतात. मात्र आजार गंभीर होणार नाही. जीवघेणा ठरणार नाही.

बातम्या आणखी आहेत...