आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Jammu Kashmir Political Parties Meeting Update | Mehbooba Mufti Farookh Abdullah, Umar Abdullah, Amit Shah, Sartaz Madani, PDP, Jammu Kashmir Election; News And Live Updates

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचाल:पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबाबत मेहबूबा मुफ्ती घेणार अंतिम निर्णय; येत्या 2 दिवसांत गुपकर आघाडीच्या बैठकीत होईल चर्चा

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले कलम 370

जम्मू-काश्मीर मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी 14 राजकीय पक्षाला निमंत्रण पाठवण्यात आले आहेत. परंतु, या बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाच्या (PDP) नेत्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, या बैठकीमध्ये पीडीपीच्या राजकीय घडामोड समितीने पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीसंदर्भांत पक्षाची काय भूमिका काय असणार यावर चर्चा केली.

पक्षाचे प्रवक्ते सैय्यद सुहेल म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीबाबतच महत्वाचा निर्णय मेहबुबा मुफ्ती घेणार असल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या गुपकार आघाडीच्या बैठकीतही यावर चर्चा होईल असे त्यांनी सांगितले.

पीडीपीचे नेते सरताज मदानी यांनी सोडले
मेहबूबा मुफ्ती यांचे मामा व पीडीपी नेते सरताज मदानी यांना शनिवार सोडण्यात आले आहे. ते गेल्या 6 महिन्यांपासून नजरकैदेत होते. त्यांच्या सुटकेवर माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही उर्वरित लोकांची सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'पीडीपी नेते सरताज मदानी यांची अटक चुकीची असून ते गेल्या सहा महिन्यापासून तुरुंगात होते. परंतु, त्यांना अखेर सहा महिन्यानंतर सोडण्यात आले ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.'

बैठकीसाठी 14 राजकीय पक्षांना निमंत्रण
या बैठकीसाठी 14 राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवले असून यामध्ये फारुक अब्दुला आण‍ि पीडीपीच्या अध्यक्ष्या मेहबूबा मुफ्ती यांचादेखील समावेश आहे. पीएमओच्या माहितीनुसार, सर्वपक्षीय नेत्यांना फोनव्दारे कळवण्यात आले असल्याने सांगितले आहे.

केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले कलम 370

  • केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले होते. त्यावेळी राज्याला दोन भागात म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागले गेले.
  • या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तथापि, काही महिन्यांनंतर त्याला सोडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...