आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Kashmir Meeting Live Update; Ajit Doval, Amit Shah, Mehbooba Mufti, Farookh Abdullah; News And Live Updates

J&K बाबत राजकीय हालचाली:दिल्लीत नड्डा यांची जम्मू-काश्मीरमधील पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा; जम्मूमध्ये मेहबूबा मुफ्ती यांचा निषेध

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींची सर्वपक्षीय बैठक आज दुपारी तीन वाजता

जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा कमी केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील 14 पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. ही बैठक आज दुपारी तीन वाजता होणार आहे. दरम्यान, या बैठकीत राज्य सुरु असणारे राजकीय गतिरोध कमी करण्यावर चर्चा होऊ शकते. ही बैठक राज्याच्या राजकारणासाठी महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण येथे 2018 पासून विधानसभा निवडणूक झाली नाही. बैठकीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा काश्मीरच्या नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेत आहे. ही बैठक दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होत आहे. यामध्ये रवींद्र रैना, कवींदर गुप्ता, निर्मल सिंग आणि मंत्री जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. दरम्यान, जम्मूमध्ये मेहबूबा मुफ्ती यांनी गुपकार आघाडीच्या बैठकीनंतर केलेल्या विधानाच्या विरोधात डोगरा मोर्चाने जोरदार निदर्शने करत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मेहबूबा यांच्या विधानावरुन त्यांना तुरुंगात पाठवले पाहिजे.

मेहबूबा दिल्लीत दाखल, फारुक अब्दुल्ला हे थोड्याच वेळात पोहोचणार
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या बैठकीसाठी दिल्ली येथे पोहोचल्या आहेत. दरम्यान, त्यांनी या बैठकीमध्ये मोकळ्या मनाने चर्चा करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी मुफ्ती यांनी कलम 370 मागे घेत केंद्र सरकारने पाकिस्तानाशी चर्चा करायला हवे असे म्हटले होते. तर दुसरीकडे, एनसी प्रमुख फारुक अब्दुल्ला बैठकीसाठी रवाना झाले असून थोड्याच वेळात पोहोचणार असल्याचे एएनआयने सांगितले आहे.

केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये हटवले कलम 370

  • केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले होते. त्यावेळी राज्याला दोन भागात म्हणजेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये विभागले गेले.
  • या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तथापि, काही महिन्यांनंतर त्याला सोडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...