आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि चीनमधील गालवान खोऱ्यातील वाढत्या तणावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लडाखला पोचले. येथे त्यांनी सैनिकांच्या भेटी घेतल्या. यापूर्वीही त्यांनी अशा आश्चर्यचकित करणारे दौरे केले आहेत. त्यांनी दोनदा एलओसीवर जाऊन सैनिकांसह दिवाळी साजरी केली आहे. 2015 मध्ये त्यांचा पाकिस्तानमधील दौरा हा सर्वात धक्कादायक दौरा होता. तेव्हा अफगाणिस्तान दौर्यावरून परत आल्यावर त्यांनी आपले विमान पाकिस्तानमध्ये उतरले होते आणि नवाज शरीफ यांच्या घरातील लग्नात पोहोचले होते. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून सहा वर्षांत त्यांनी अशा 9 सरप्राइज व्हिजिट केल्या आहेत.
19 फेब्रुवारी 2020: दिल्लीच्या जत्रेत लिट्टी-चोखा खाल्ला होता
पंतप्रधान मोदी यावर्षी 19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील राजपथ जवळ हुनर हाट येथे पोहोचले. येथे त्यांनी बिहारची पारंपारिक डिश, लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला होता. त्यांनी वेगवेगळ्या स्टॉलवर प्रवास करून कारागिरांना प्रोत्साहन दिले होते.
27 ऑक्टोबर 2019: नियंत्रण रेषेवर जवानांना दिवाळी मिठाई खाऊ घातली
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यानंतर मोदींनी गेल्या वर्षी राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवरील सैनिकांसह दिवाळी साजरी केली. त्यानंतर पंतप्रधानांनी बीजी ब्रिगेडच्या मुख्यालयात सैनिकांना हातांनी मिठाई खाऊ घातली होती.
7 नोव्हेंबर 2018: उत्तराखंडचा हर्षिल येथे दाखल झाले होते
यावर्षी मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये दिवाळी साजरी केली होते. ते सैनिकांना भेटले. त्यावेळी त्यांनी केदारनाथ मंदिरातही दर्शन घेतले होते.
18 ऑक्टोबर 2017: एलओसीवर गुरेज सेक्टरवर पोहोचले
यावर्षी मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. ते जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमधील सैन्यांसोबत दाखल झाले होते. त्यांनी सैनिकांच्या बलिदानाचे कौतुक करत ते आपले कुटुंब असल्याचे म्हटले होते. तसेच ते म्हणाले होते की, "जेव्हा मी तुमच्याशी हस्तांदोलन करतो तेव्हा मला खूप ऊर्जा मिळते. या कठीण परिस्थितीत आपण किती तपर्श्चर्या आणि त्याग करत आहात हे मी पाहत आहे "
30 अक्टोबर 2016 : हिमाचलच्या सुमडोमध्ये सैनिकांमध्ये पोहोचले होते
मोदी हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यामध्ये भारत-चीन बॉर्डरजवळ पोहोचले होते. येथे त्यांनी सुमडोमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. या प्रसंगी ते जवानांना म्हणाले होते की, ते 2001 पासून प्रत्येक वर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.
11 नोव्हेंबर 2015 : अमृतसरमध्ये सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली
मोदी अमृतसरमध्ये सैनिकांसह दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले होते. तिथे त्यांनी डोगराई वॉर मेमोरियल येथे पोहोचून 1965 युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली होती. ते उत्तर स्मारक आणि परमवीर चक्रि विजेता शहीद अब्दुल हमीद यांच्या समाधीवर पुष्प अर्पित करण्यासाठीही पोहोचले होते.
23 अक्टोबर 2014 : पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्यांदा सियाचिनमध्ये दिवाळी साजरी केली होती
केंद्राची सत्ता सांभाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रे मोदींनी पहिल्यांदा सियाचिनमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यांनी जगातील सर्वात ऊंच युद्धक्षेत्रात पोहोचून जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती.
25 डिसेंबर 2015 : अचानक पाकिस्तानात पोहोचले होते
मोदी अफगानिस्तान दौऱ्यावरुन परतत असताना अचानक लाहौरला पोहोचले होते. त्यांनी येथे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्चा दिल्या होत्या. त्यांच्या नातीच्या लग्नात ते उपस्थित राहिले होते आणि आशीर्वाद दिले होते. लाहौरपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर शरीफ यांच्या वंशपरंपरागत घरी पोहोचले होते. येथे जवळपास 90 मिटर थांबल्यानंतर ते दिल्लीत परतले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.