आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Latest News Update; Narendra Modi, PM Modi, Health Secretary Latest News, Health Secretary Rajesh Bhushan In Parliament, Rajesh Bhushan, Corona Outbreak In India​​​​​​​; News And Live Updates

कोरोनावर सरकारचा रोडमॅप:पंतप्रधानांच्या उपस्थितीत आरोग्य सचिव करणार सभागृहातील नेत्यांना संबोधित; तृणमूल काँग्रेस आणि अकाली दलाचा बैठकीत सामील होण्यास नकार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदी करणार होते प्रेझेन्टेशन

कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी जास्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव पंतप्रधानांच्या उपस्थितीत सभागृहातील नेत्यांना संबोधित करणार आहे. दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती व्यवस्थापनाशी संबंधित प्रेझेन्टेशन सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदरील बैठकीमध्ये सर्व पक्षातील नेते सहभागी होणार आहे. परंतु, तृणमूल काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाने या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी करणार होते प्रेझेन्टेशन
आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याऐवजी पंतप्रधान मोदी कोरोनावर सादरीकरण करणार होते. परंतु, याविरोधात विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला होता. म्हणून या बैठकीत आरोग्य सचिव भूषण सादरीकरण करतील. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरु आहे तेव्हा पंतप्रधानांनी आपली बाजू सभागृहात मांडायला हवी असे विरोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या 24 तासांत आढळले 29,413 नवे रुग्ण

  • देशात गेल्या 24 तासात देशात 29 हजार 413 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 45 हजार 345 लोक उपचार घेत बरे झाले आहे. तर यामध्ये 372 लोकांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे.
  • नवीन कोरोनाबाधितांचा हा आकडा गेल्या 125 दिवसांत सर्वात कमी आहे. यापूर्वी 16 मार्च रोजी 28 हजार 869 लोक पॉझिटिव्ह आढळले होते.
  • मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासातील मृतांचा आकडा हा 111 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 355 लोकांचा मृत्यू झाला होता.

सक्रिय रुग्णसंख्येत घट
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात या आकडेवारीत 16 हजार 322 ने घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात सध्या 3 लाख 99 हजार 998 लोकांवर उपचार सुरू आहे. हा आकडा गेल्या 117 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 24 मार्च रोजी 3 लाख 91 हजार सक्रिय रुग्ण होते.

बातम्या आणखी आहेत...