आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Live; Mann Ki Baat Live, PM Modi Live, PM Modi, Coronavirus, Vaccination, Delta Plus Varient; News And Live Updates

मोदींची 'मन की बात':पंतप्रधान म्हणाले- लस घ्या, अफवांकडे लक्ष देऊ नका; माझ्या 100 वर्षाच्या आईने दोन्ही डोस घेतले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधानांनी मिल्खा सिंग यांच्या आठवणींना दिला उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील जनतेशी रेडिओवरुन मन की बात कार्यक्रमाव्दारे संबोधित करत आहे. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील 25 वा तर एकूण 78 भाग आहे. मन की बात दरम्यान, मोदी यांनी मध्यप्रदेशातील बैतूल गावातील लोकांशी संवाद साधला. दरम्यान, गावातील लोकांनी आमच्याकडे लसीकरणासंदर्भांत अफवा पसरवण्यात येत असून यामुळे मृत्यू होत असल्याचे मोदी यांना सांगितले.

प्रत्युत्तरात मोदी म्हणाले की, लसीकरणासंदर्भांत ज्या अफवा पसरण्यात येत आहे त्याला आपल्याला थांबवायच्या आहेत. मी आणि माझी आई दोघांनी मिळून लसींचे दोन्ही डोस घेतले आहे. लसींमुळे मृत्यू होतो यामध्ये थोडेही सत्य नाही. त्यामुळे तुम्हीही लस घ्या आणि इतरांना प्रेरित करा.

कोरोनापासून फक्त लस वाचवेल - मोदी
पंतप्रधान मोदी यांनी बैतूल गावातील किशोरी लाल हिला कोरोनाच्या अफवा संदर्भांत काही ऐकले आहे का असे विचारले‌? त्यावर किशोरी म्हणाल्या की, माझ्या नातेवाईकांनी लसींमुळे लोक आजारी पडत असून यामुळे मृत्यू होते असे सांगितले. यावर मोदी म्हणाले की, आपल्याला अशा अफवांकडे लक्ष न देता आपला जीव, आपले लोक, आपल्या देश वाचवायचा आहे. कारण कोरोना हा संगर्सजन्य रोग असून यावर लसीकरण एकच उपाय असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी प्रवीण जाधवला ऑलिम्पिकसाठी दिल्या सुभेच्छा
पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमामध्ये साताऱ्याच्या प्रवीण जाधवचा उल्लेख केला. प्रवीण जाधव हे तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू असून त्याने अतिशय गरीब परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रवीण जाधव यांचे आई वडील मोलमजूरी करणारे असून त्यांनी अतिशय कष्ट प्रवीणला ऑलिम्पिकपर्यंत पाठवले आहे. त्यामुळे ही बाब फक्त त्यांच्या आई-वडीलासांठीच अभिमानाची नसून संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी मिल्खा सिंग यांच्या आठवणींना दिला उजाळा
देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आता ऑलिम्पिकची चर्चा होत आहे, तेंव्हा महान घावपटू मिल्खा सिंग यांना कसे विसरता येईल. काही दिवसांपूर्वी कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा मिल्खा सिंग रुग्णालयात होते तेंव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी बोलताना त्यांना म्हटले की तुम्हाला टोकियो ऑलिम्पिकचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्यासोबतच आपल्या देशातून ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवत त्याना आपल्या संदेशातून प्रेरणा देण्यास सांगितले होते.

शेवटच्या वेळी दुसर्‍या लाटेवर विजयाचा मंत्र दिला
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजीच्या मन की बात मध्ये दुसऱ्या लाटेवर कसे नियंत्रण मिळवता येईल याचा संदेश दिला होता. ते म्हणाले होते की, ज्या ताकदीने आम्ही पहिल्या लाटेला पराभूत केले अगदी तसेच दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. परंतु, त्यासाठी आपल्याला मास्क, सामाजिक अंतर, कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...