आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Live; Mann Ki Baat Live, PM Modi Live, PM Modi, Coronavirus, Vaccination, Delta Plus Varient, Tokyo Olympics, Corona Third Wave; News And Live Updates

मन की बात:पंतप्रधान म्हणाले - भारत जोडो अभियान चालवा; आपल्याला 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' या मंत्राने पुढे जावे लागेल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओच्या माध्यमातून 'मन की बात'व्दारे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. पंतप्रधानांचा हा आजचा 79 वा भाग आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये गेलेल्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यास सांगितले आहे. तसेच स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट'चा नारा दिला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो अभियानाच्या धर्तीवर देशातील जनतेने भारत जोडो अभियान चालवावे असे ते म्हणाले.

कार्यक्रमात मोदींनी आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडूसह देशभरात नाविन्यपूर्ण कामे करणाऱ्या लोकांचे कौतुक केले. 'व्होकल फॉर लोकल'चा संदेश देत त्यांनी लोकांना हातमाग आणि खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. मोदी पुढे म्हणाले की, जो देशासाठी तिरंगा उचलतो, देशप्रेमाची ही भावना आपल्याला जोडून ठेवते. उद्या कारगिल विजय दिवस असून तो आमच्या सैन्याचा शौयाचा प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी ती कथा वाचली पाहिजे अशी माझी इच्छा असल्याचे ते म्हणाले.

ऑलिम्पिकमधील खेळाडूंना प्रोहात्सान देण्यासाठी विजय पंच मोहीम
मोदी म्हणाले की, 'दोन दिवसांपूर्वीचे काही अविस्मरणीय क्षण माझ्या डोळ्यासमोर आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना पाहून संपूर्ण देश रोमांचित झाला होता. संपूर्ण देशाने त्यांना 'तुमचा विजय हो.' अशी प्रार्थना केली होती. आज त्यांच्याकडे तुमच्या प्रेमाची आणि समर्थनाची शक्ती आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या समर्थनासाठी विजय पंच मोहीम सुरू झाली आहे असे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आता आपल्याला भारत जोडो अभियान चालवावे लागेल. 'नेशन्स फर्स्ट, ऑलव्हेज फर्स्ट' हा मंत्र घेत पुढे जावे लागणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले आहे.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा साक्षीदार होण्याचे भाग्य
भारत देशाला येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र मिळून 75 वष होणार आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी भाग्याची असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ज्या स्वातंत्र्यांसाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली आज आपण त्याचा 75 वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे. तुम्हाला आठवत असेल की स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 12 मार्च रोजी बापूंच्या साबरमती आश्रमातून 'अमृत महोत्सव' सुरू झाला आहे. या कार्यक्रमाव्दारे जम्मू-काश्मीर ते पुडुचेरी, गुजरात ते ईशान्य पर्यंत अमृत महोत्सवाशी संबंधित कार्यक्रम देशभर सुरू आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत उत्सव हा राजकीय कार्यक्रम नाही
'अमृत महोत्सव' हा कोणत्याही सरकारचा कार्यक्रम नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, तो प्रत्येक भारतीय नागरिकांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीय आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहतो. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मार्गावर चालणे, त्यांच्या स्वप्नांचा देश बनविणे हीच भावना असून हाच त्यांचा या उत्सवाचा सार असल्याचे मोदी म्हणाले. ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सैनिक संघटीत झाले होते त्याच प्रकारे आपल्याला देशाच्या विकासासाठी एक होणे आवश्यक आहे.

पंतप्रधानांनी पुन्हा व्होकल फॉर लोकलचा दिला नारा
ते पुढे म्हणाले की, आपण रोजच्या कामकाजातून देशाची उभारणी करु शकतो. त्यासाठी व्होकल फॉर लोकल व्हावे लागणार आहे. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, कारागीर, विणकरांना मदत करणे आपल्या जन्मजात असले पाहिजे. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन आहे. या दिवसाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या दिवशी 1905 मध्ये स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. ते पुढे म्हणाले की, हँडलूम हा आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. हे असे क्षेत्र आहे ज्यात लाखो महिला, लाखो विणकर, लाखो कारागीर या व्यवसायाशी जोडलेले आहेत.

यापूर्वी 27 जून साधला होता संवाद
पंतप्रधानांनी यापूर्वी 27 जून रोजी देशातील जनतेशी संवाद साधला होता. दरम्यान, त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यास सांगितले होते. कारण त्यांनी येथे पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला असल्याचे ते म्हणाले होते.

ऑलिम्पिकवर बोलले होते पंतप्रधान
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जेव्हा कौशल्य, समर्पण आणि दृढनिश्चय एकत्र येतात तेव्हा एखादा माणूस चॅम्पियन बनतो. आपल्या देशातील बहुतेक खेळाडू छोट्या शहरांमधून, गाव आणि खेड्यांमधून येतात. टोकियोमध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या पथकातही या खेळाडूंचा समावेश आहे.

कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली
प्रसार भारतीने आतापर्यंत आपल्या अखिल भारतीय रेडिओ, दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'मन की बात' कार्यक्रमाचे 78 भाग प्रसारित केले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 19 जुलै रोजी राज्यसभेत असे सांगितले होते. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC) च्या आकडेवारीनुसार, 2018 ते 2020 दरम्यान रेडिओ कार्यक्रमांमधील एकूण दर्शक संख्या अंदाजे 6 कोटी 14.35 कोटी इतकी झाल्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...