• Home
  • National
  • Covid 19: Narendra Modi Live PM Modi Latest News Updates; PM Narendra Modi Address Nation

कोरोना : 21 दिवस संपूर्ण देश लॉक, कोरोनाच्या रावणापासून वाचायचे असेल तर ही लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अन्यथा पिढ्या बरबाद होतील...

  • 21 दिवस परिस्थिती आटोक्यात नाही आली, तर देश 21 वर्षे मागे जाईल...

  • कोरोनाशी लढताना एकमेव पर्याय आहे सोशल डिस्टंसिंग - पीएम मोदी

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 08:39:01 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 पासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अदाजही लावता येणार नाही. देशात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्यायला हवे. आरोग्य क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता, देशात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठीच आज रात्री 12 वाजल्यापासून देशभर लॉकडाउन जारी केला जात आहे.

कोरोनाविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी निर्णय आवश्यक होता...

हिंदुस्थानाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.

कुणीही रोडवर येऊ नका; मोदींनी पोस्टर दाखवून सांगितला कोरोनाचा 'खरा अर्थ'

21 दिवस परिस्थिती आटोक्यात नाही आली, तर देश 21 वर्षे मागे जाईल...

मोदींनी सांगितल्याप्रमाणे, निश्चितच लॉकडाउनचा आर्थिक फटका देखील बसेल. पण, एक-एक भारतीयाच्या आयुष्य, तमचे परिवार वाचवणे हेच माझे, भारत सरकारचे आणि राज्य सरकारचे सर्वात पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे, माझी तुम्हाला विनंती आहे. हात जोडून प्रार्थना आहे, की तुम्ही सध्या देशात जेथे आहात. तेथेच राहा. सध्याची परिस्थिती पाहता, देशात लॉकडाउन 21 दिवसांचा राहील. तीन आठवड्यांचा. यापूर्वी तुमच्याशी बोललो होतो. त्यावेळी मी म्हटलो होतो, की तुमच्याकडे काही आठवडे मागण्यासाठी आलो आहे. आगामी 21 दिवस प्रत्येक नागरिक, प्रत्येक परिवारासाठी खूप महत्वाचे आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे. येत्या 21 दिवसांत परिस्थिती आटोक्यात नाही तर देशा आणि आपले कुटुंब 21 वर्षे मागे जाईल. अनेक कुटुंब नेहमीसाठी बर्बाद होतील. ही गोष्ट एक पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून सांगतो. बाहेर पडणे काय असते हे 21 दिवसांसाठी विसरूनच जा. घरात राहा आणि तेथेच काम करा.

कोरोनाशी लढताना एकमेव पर्याय आहे सोशल डिस्टंसिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळेच पाहू शकता की जगभरातील सामर्थ्यशाली देश सुद्धा या रोगाशी लढण्यात असमर्थ ठरत आहेत. असेही नाही की देश प्रयत्न करत नाही, किंवा त्यांच्याकडे आवश्यक साधन सामुग्री नाही. पण, कोरोना व्हायरस इतक्या झपाट्याने वाढत आहे की सर्वच पूर्व तयाऱ्या फौल ठरत आहेत. या सर्वच देशांच्या अभ्यासातून एक गोष्ट समोर आली आहे. तज्ज्ञांचे सुद्धा यावर दुमत नाही, की कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सोशल डिस्टंसिंग एकमेव पर्याय आहे.

X