आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11.30 वाजता एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी देशातील ऑक्सिजनमध्ये वाढ आणि उपलब्धेतचा आढावा घेणार आहेत. यावितिरिक्त देशातील ऑक्सिजनच्या उपलब्धेतमध्ये आणखी वाढ करण्यासाठी आवश्यक त्या उपायांवर चर्चा करणार आहेत.
बैठकीदरम्यान, देशभरात 1,500 पेक्षा जास्त ऑक्सिजन प्लांट उभारले जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, हे पीएसए प्लांट पीएम केयर्स फंड उभारले जात असून यामुळे देशातील 4 लाख पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडला आधार मिळणार आहे. हे प्लांट लवकरात लवकर सुरु होणार असून यासाठी आवश्यक त्या उपायोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
देशात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासली होती. यामुळे देशातील असंख्य लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मोदी सरकारने देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिले होते.
तिसऱ्या लाटेच्या भीतीदरम्यान बैठक
देशात येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना कडक पाऊले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. अशावेळी देशातील औषधांचा साठा, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक सामग्रींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार कामाला लागल आहे.
पंतप्रधानांच्या आढावा बैठकीतील महत्वाचे मुद्दे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.