आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Live Update | Cyclone Yaas Latest News Update, National Disaster Management Authority (NDAF), Telecom Ministries

'यास' चक्रीवादळ:PM मोदींनी तयारीचा आढावा घेतला, NDMA-NDRF सहित 14 विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तौक्ते चक्रीवादळानंतर आता देशाला 'यास' चक्रीवादळाचा धोका आहे. पूर्वमध्य बंगालच्या खाडीमध्ये शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे सोमवार, 24 मे रोजी त्याचे ‘यास’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हे वादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यासह 14 विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीला पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अंदमान-निकोबार बेटे आणि पुडुचेरीचे मुख्य सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, एनडीएमएचे सदस्य सचिव, IDF चीफ, गृह, ऊर्जा, शिपिंग, दूरसंचार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नागरी विमान वाहतूक आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. कोस्ट गार्ड, एनडीआरएफ आणि आयएमडीचे डीजीही बैठकीस उपस्थित होते.

बंगाल आणि ओडिशाला सर्वात जास्त धोका
पश्चिम बंगाल,ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात ताशी १५५ ते १६५ किलोमीटरच्या तुफान वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालमधील गंगेच्या परिसरातील भागात आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडेल. किनाऱ्यावर प्रचंड मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने २३ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नका, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

एनडीआरएफची 85 पथके तैनात
चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. यामध्ये कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी उपस्थित होते. वादळाची शंका असलेल्या राज्यांमध्ये बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन दलाची (एनडीआरएफ) ८५ पथके सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता, हावडा या जिल्ह्यांसह ११ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...