आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, बैठकीत मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचादेखील आढावा घेतला. त्यासोबतच मोदी यांनी देशातील तज्ञांसोबत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली असून कोरोनाशी लढण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली गेली आहे.
सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये वैद्यकीय आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जे विद्यार्थी वैद्यकीय आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाला असतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन सेवा देण्यासाठी तयार केले जाणार आहे.
दरम्यान, बैठकीत एनईईटी परिक्षांच्या विलंबावरदेखील चर्चा करण्यात असून याबाबत सविस्तर माहिती सोमवार दिली जाणार आहे.
मंत्र्यांना संदेश - आपापल्या भागातील लोकांच्या संपर्कात रहा
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत मंत्र्यांना आपापल्या भागातील जनतेशी संपर्क साधण्यास सांगितले होते. दरम्यान, लोकांना मदत करत त्यांचा अभिप्राय जाणून घेत राहण्याचा सल्लादेखील मोदी यांनी दिली होता. मोदी पुढे म्हणाले होते की, संरक्षण मंत्रालयाने भारतीय सशस्त्र दलांना आपत्कालीन आर्थिक शक्ती प्रदान केली आहे. जेणेकरुन ते या रोगाचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.