आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात काही राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन राज्याच्या निवडणूक दौऱ्यावर आले आहेत. ते येथील दोन सभेला संबोधित करतील. त्यांची पहिली सभा ही आसाममधील बोकाखाट येथे सकाळी 11.30 होईल आणि त्यानंतर ते पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे दुपारी 3.30 दुसऱ्या सभेला संबोधित करणार आहेत.
सभेसाठी शिशिर आणि दिव्येंदु अधिकारी यांना आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नंदीग्रामचे भाजप उमेदवार शुभेंदु अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी आणि भाऊ दिव्येंदु अधिकारी यांना भाजपकडून आमंत्रण पाठवण्यात आले आहेत. परंतु, हे दोन्ही आजघडीला टीएमसीचे पक्षाशी संबंधित असून शिशिर हे बंगाल काठी आणि दिव्येंदु हे तमलुक या लोकसभा क्षेत्रातून टीएमसीचे खासदार आहेत. परंतु, हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशाने भाजप उत्साहित
पश्चिम बंगालमधील 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला 2 जागा मिळाल्या असून त्यांचा वोट शेअर 17% होता. 2016 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 3 जागा जिंकत आपले वोट शेअर 10% ठेवले होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगले प्रदर्शन दाखवत त्यात 18 जागा जिंकल्या होत्या आणि आपले वोट शेअर 40.64% पोहोचवले होते.
आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान
आसाम राज्यात 126 सदस्य असलेल्या विधानसभा जागेवर 27 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत तीन टप्प्यात मतदान होणार आहे. यात पहिला टप्प्यातील 47 जागेसाठी 27 मार्चला मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यातील 39 व तिसऱ्या टप्प्यातील 40 जागेसाठी 6 एप्रिलला मतदान होणार असून निकाल 2 मार्चला लागणार आहे.
बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान
पश्चिम बंगालमधील 294 जागेसाठी 8 टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. यात 27 मार्च (30 जागा), 1 एप्रिल (30 जागा), 6 एप्रिल (31 जागा), 10 एप्रिल (44 जागा), 17 एप्रिल (45 जागा), 22 एप्रिल (43 जागा), 26 एप्रिल (36 जागा) २ एप्रिलला (35 जागा) मतदान होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.