आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Live Update | PM Modi Live Update, Narendra Modi Live, Modi Live, Coronavirus Outbreak, District Magistrate, Delhi, Madhya Pradesh, Uttar Pradesh

नरेंद्र मोदींची बैठक:पंतप्रधान आज राज्य आणि जिल्ह्यांच्या फील्ड ऑफिसर्ससोबत बैठक करतील; कोरोना परिस्थितीवर होईल चर्चा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 मे रोजी 10 राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राज्य आणि जिल्ह्यातील फील्ड ऑफिसर्ससोबत बैठक करतील. यादरम्यान देशातील कोरोना परिस्थितीवर चर्चा होईल. देशातील अनेक जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान या परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत बोलू शकतात. पंतप्रधान कार्यालयाने सांगितल्यानुसार, बैठकीत कर्नाटक, बिहार, असाम, चंडीगड, तमिळनाडु, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांचा सहभाग असेल.

या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

पीएम मोदी या मीटिंगमध्ये गाव आणि मागास भागात कोरोना पसरण्यापासून रोखणे आणि उपाय योजना करण्याबाबत चर्चा करतील. तसेच, कोरोना संसर्ग लहान लहान गावामध्ये जाऊ नये, यासाठी काय करता येईल, यावरही चर्चा होईल.

20 मे रोजी 10 राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीनंतर मोदी 20 मे रोजी इतर 10 राज्यातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित जिल्ह्यांच्या 54 जिलाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पुड्डुचेरी, राजस्थान, महाराष्ट्र, झारखंड, उड़ीसा, केरळ आणि हरियाणाचे जिलाधिकारी सामील आहेत.

यापूर्वी डॉक्टरांसोबत बैठक घेतली
काल म्हणजेच सोमवारी पंतप्रधान मोदींनी देशभरातील डॉक्टर्ससोबत व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक घेतली होती. मोदींनी सर्व शहरी डॉक्टरांना त्यांचा अनुभव ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...