आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Live Update | PM Modi Live Update, PM Modi, Jal Shakti Abhiyan Catch The Rain Campaign, Jal Shakti Abhiyan Launching, Narendra Modi, Prime Minister Narendra Modi, Yogi Adityanath, Shivraj Singh Chauhan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅच द रेन कॅम्पेन:पंतप्रधान मोदी यांनी केली जलशक्ती अभियानाची सुरुवात; 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण देशात मोहीम राबवणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जलशक्ती अभियानाचा हेतू लोकांना पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकांना पुढे आणणे

जागतिक जल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाचे उदिष्टे पावसाचे पाणी वाचवणे आण‍ि पाण्याच्या संर्वधनसाठी लोकांना पुढे आणणे आहे. यामुळे मध्यप्रदेश आण उत्तरप्रदेशमधील काही जिल्हांना दुष्काळी परिस्थितीत फायदा मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मोदी यांनी व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगव्दारे केली होती आण‍ि या अभियानाला 'कॅच द रेन कॅम्पेन' नाव देण्यात आले आहे.

'कॅच द रेन कॅम्पेन' या अभियानाची सुरुवात पावसाळा सुरु होण्याच्या आण‍ि संपण्याच्या अगोदर म्हणजेच 30 मार्च ते 30 नोव्हेंबरच्या मध्ये करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात सामील करण्यात येणार असून यामुळे एकप्रकारची जलशक्ती अभियानाची चळवळ उभी केली जाणार आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, लोकांमध्ये पावसाच्या पाण्याबाबत जागरुकता तयार करणे आण‍ि पाण्याचे संवर्धन करत या मोहीमेसाठी लोकांना पुढे करणे हे ह्या अभियानाचे मुख्य हेतू आहे.

'केन-बेतवा कनेक्टिव्हिटी' प्रकल्पावर शिक्का मोर्तब
'केन-बेतवा कनेक्टिव्हिटी' प्रकल्प हा देशातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा ऐतिहासिक करार झाला असून त्यावर केंद्रीय जल उर्जामंत्री गजेंद्रसिंग शेखावत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ह्यासाठी संमती दर्शवली आहे.

निवडणुकीचे राज्य सोडून इतर राज्यात कार्यक्रम होणार
या कार्यक्रमानंतर पाणी आणि जलसंधारणासंदर्भात देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम होणार असून प्रत्येक ग्रामसभा यासाठी शपथ घेणार आहे. परंतु, हे ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यात हे कार्यक्रम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...