आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Lockdown Extension | PM Narendra Modi Latest News Updates, PM Modi State Chief Minister Meeting On COVID 19 Lockdown Extension In Madhya Pradesh Haryana Maharashtra Rajasthan

लॉकडाउनवर चर्चा:मुख्यमंत्र्यांच्या मागणीवरून आणखी दोन आठवड्यांनी वाढणार देशव्यापी लॉकडाउन; लवकरच दिशा-निर्देश जारी करणार केंद्र सरकार

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन वाढवावा की नाही यावर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी व्हर्चुअल संवाद साधला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून तिसऱ्यांदा संवाद साधला. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला. 14 मार्च रोजी हा लॉकडाउन संपुष्टात येणार आहे. तोच वाढवण्यावर केंद्राने राज्यांचा सल्ला घेतला आहे. त्यामध्ये जवळपास सर्वांनीच लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा असे म्हटले आहे.

मोदींनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यानुसार, देशभरातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही 30 एप्रिलपर्यंत वाढवला जाऊ शकतो. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये लॉकडाउन आणि कोरोनावर चर्चा झाली. यापूर्वी 20 मार्च आणि 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनी संवाद साधला होता. दरम्यान, यावेळी आपण मदतीसाठी आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे 24 तास उपलब्ध आहोत असे मोदी म्हणाले आहेत.

केंद्र सरकारनेही मान्य केले 2 आठवड्यांनी लॉकडाउन वाढवण्याचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच लॉकडाउनवर सर्वांची मते जाणून घेतली. बहुतांश मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची शिफारस केली. त्यानुसार, केंद्र सरकार सुद्धा हा लॉकडाउन आणखी 15 दिवस वाढवण्याचा विचार करत आहे असे सरकारच्या प्रवक्यांनी शनिवारी सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्रीही म्हणाले दोन आठवड्यांनी वाढणार लॉकडाउन

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाउन 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवडे वाढवणार आहेत. केंद्र सरकार यासंदर्भात लवकरच दिशानिर्देश जारी करणार आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत. येदियुरप्पा यांनी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ठाकरेंनी मांडली महाराष्ट्राची कैफियत, लॉकडाउन वाढवण्याची मागणी

या चर्चेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री आप-आपल्या राज्यांची परिस्थिती मांडत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लॉकडाउन किमान 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात यावा अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह दिल्ली आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लॉकडाउनचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली आहे. अनेक राज्यांनी केंद्र सरकाकडून काय मदत हवी आहे याचा तपशील सुद्धा मांडला आहे.

अनेक राज्यांकडून लॉकडाउन वाढवण्याची मागणी

आतापर्यंत देशातील 9 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी डगमगलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणता येईल. परंतु, गेलेले जीव परत येणार नाहीत असाही तर्क दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून लॉकडाउनवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यानंतर 14 एप्रिल रोजी मोदी पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून लॉकडाउन हटवणे किंवा वाढवण्यावर अधिकृत घोषणा करू शकतात असे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...