आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Election 2021
  • Narendra Modi Mann Ki Baat Live Update | West Bengal Assembly Election, West Bengal Election, Tamilnadu Election, Assam Election, Assembly Election 2021, Farmers Protest, Corona Vaccine, Corona Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मन की बात':पंतप्रधान मोदी यांच्या मनात निवडणुकीचे 'ते' चार राज्य; बोलताना 'त्या' राज्याचे आणि तेथील लोकांचे केले कौतुक, शेतीच्या आधुनिकीकरणावर भर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज रविवारी पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाच्या 75 व्या भागात ते बोलत होते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमामधून देशातील लोकांना संबोधित करत होते. ३२ मिनीट चाललेल्या या संभाषणामध्ये मोदी यांनी निवडणूक असलेल्या चार राज्याचे उल्लेख करायले विसरले नाही. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश असून त्यांनी त्या राज्याची आणि तेथील लोकांची मोठ्या प्रमाणावर कौतूक केले. यावितिरिक्त त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांवरदेखील भाष्य केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, शेतीच्या आधुनिकीकरणामध्ये आम्ही खूप मागे असून आम्हाला काळानुसार बदल करता यायला हवे.

गेल्या वर्षीच्या जनता कर्फ्यूची आठवण

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षीच्या 'जनता कर्फ्यू'ची आठवण करुन देत हा जनता कर्फ्यू हा अभूतपूर्व असून येणाऱ्या पिढ्यांना त्याचा अभिमान वाटेल असे ते म्हणाले.

मन की बात करताना भावनिक झाले मोदी

मोदी यांनी सांगितले की, "हा 'मन की बात'चा कार्यक्रम जणूकाही आताचा सुरु केला आहे असा वाटतोयं, ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरु झालेला हा प्रवास होळीपर्यंत येऊन ठेपला आहे."

कोरोना वारियर्सच्या धैर्याचे केले कौतुक

गेल्या वर्षी जनता कर्फ्यू हे नाव आपण पहिल्यांदाच ऐकले असून हे शिस्तीचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. कारण यामुळे संपूर्ण जगाने आपले कौतूक केले होते. "कोरोना वॉरियर्सला आपण चालवलेल्या 'थाळी आणि टाळी' या उपक्रमामुळे धैर्य आले असून त्यांनी आपले जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे जीव वाचवले असल्याची आठवणदेखील त्यांनी यावेळी करुन दिली.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम

पंतप्रधान म्हणाले, मागील वर्षी याच वेळी व्हॅक्सिन केव्हा येणार हा प्रश्न होता. परंतु आज आपण जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहोत. देशातील कानाकोपऱ्यातून चांगल्या बातम्या समोर येत आहेत. याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये 109 वर्षाच्या वृद्ध आई राम दुलैया यांनी लस घेतली आहे. दिल्लीमध्येही 107 वर्षांच्या केवल कृष्ण यांनी लस घेतली आहे. मी ट्विटर,फेसबुकवर पाहत आहे की, लोक कशाप्रकारे घरातीम वृद्ध मंडीळीचे लसीकरण केल्यानंतर त्यांचे फोटो अपलोड करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...