आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Mann Ki Baat | Mann Ki Baat, Coronavirus Second Wave In India, Farmers Protest, Corona Vaccine, Corona Cases, Vaccine Shorgate, Covaxin, Covishield; News And Live Updates

मोदींची 'मन की बात':भारतात पूर्वीच्या तुलनेत दहापट ऑक्सिजनचे उत्पादन; तौक्ते आणि यास वादळांचाही आम्ही सामना केला...

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गेल्या वर्षीपासून डॉक्टर, परिचारिका सतत काम करत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशातील जनतेला संबोधित केले. कार्यक्रमात मोदी म्हणाले की, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान अचानकपणे ऑक्सिजनची मागणी वाढली. त्यामुळे सगळीकडे ऑक्सिजनचा तुडवडा भासायला लागला. परंतु, आपत्तीच्या काळातही देशाने आपली क्षमता वाढवण्यावर भर दिला. त्यामुळे आता आपण पूर्वीच्या तुलनेत 10 पट ऑक्सिजन तयार करत आहोत.

देशावर कितीही मोठे संकट आले तरी भारताने त्याला आव्हान दिला आहे. सेवाभक्ती आणि शिस्तीने देशाला प्रत्येक वादळापासून मुक्त केले आहे. कोरोनाकाळात तिन्ही सैन्यांचे दलांचे सर्व सैनिक कोरोनाविरूद्ध लढण्यात गुंतले असून त्यांच्यावर संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे मोदी म्हणाले.

डॉक्टर, परिचारिका सतत काम करत आहे - मोदी

पंतप्रधान मोदी कार्यक्रमात पुढे म्हणाले की, देशात गेल्या वर्षीपासून डॉक्टर, परिचारिका सतत काम करत आहे. दरम्यान, ते या सर्व परिस्थितीत प्रचंड तणावाखाली जगत असून योद्धांवर चर्चा करण्यासाठी मला आवाहन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या ट्रँकर आणि रेल्वे चालकांनीदेखील पुढे येत देशसेवा केली असल्याचे ते म्हणाले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या गोष्टी

1. आपत्तींमध्ये अनेक लोकांचे जीव वाचवण्यात यश
गेल्या वर्षाभरापासून आपण अनेक लोकांचे जीव वाचवत असून तौक्ते आणि यास चक्रीवादळातदेखील मोठ्या प्रमाणात जीवीतहाणी झाली नसल्याचे मोदी म्हणाले. संकटाच्या काळात ज्या धैर्य आणि शिस्तीने तेथील लोकांनी काम केले आणि मदतीसाठी पुढे येणाऱ्या लोकांचादेखील मोदींनी आभार मानले. ते पुढे म्हणाले की, या आपत्तींविरोधात केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे लढा द्यायला हवा. ज्यांनी या चक्रीवादळात आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या.

2. शेतकरी आणि गरिबांबद्दलही बोलले मोदी
कार्यक्रमादरम्यान, मोदी यांनी देशातील शेतकरी वर्ग आणि गरिबांबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, देशात शेतकऱ्यांनी यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतले असून खरेदीह मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यासोबच देशातील प्रत्येक गरिबांच्या घरात चुल पेटण्यासाठी 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिल्या जात आहे. अगरताळाचे शेतकरी फणसाचे उत्पन्न घेत असून त्याची देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे फणस गुवाहाटीतून लंडनला निर्यात करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...