आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi May Meet Chief Minister Uddhav Thackeray Today, Discuss Possible Measures On Corona And Unlock

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बैठक:पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक, कोरोनावरील उपाययोजना आणि अनलॉकवर होऊ शकते चर्चा

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीचे धोरण आणि अर्थव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांशी चर्चा केली. आज पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मध्य प्रदेश, गुजरात, दिल्लीसह उर्वरित १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान चर्चा करतील. कोरोनावरील उपाययोजना आणि अनलॉकवर होऊ शकते चर्चा.

6 राज्य वगळता इतर राज्य हे लिखित स्वरुपात आपले मत व्यक्त करतील 

मोदींच्या बैठकीमध्ये आज 15 पैकी केवळ 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळू शकते. ज्या राज्यांना बोलण्याची संधी मिळणार नाही ते लिखित स्वरुपात आपले मत व्यक्त करणार आहेत. मीटिंमघ्ये अनलॉक-1 चा प्रभाव कसा होता याचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच यापुढची उपाययोजना काय यावरही चर्चा केली जाईपल. यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेतली होती. 

ममता बॅनर्जींची नाराजी

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः मीटिंगमध्ये सहभागी होण्याऐवजी एखाद्या अधिकाऱ्याला बैठकीत बसवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आजच्या चर्चेमध्ये ज्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळणार आहे. त्या लिस्टमध्ये ममता बॅनर्जी यांचे नाव नाही. 

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्था चटर्जी यांनी सांगितले आहे की, ममता बॅनर्जी यांना बोलण्याची संधी न देऊन केंद्र सरकारने पुन्हा एकदा बंगालच्या लोकांचा अपमान केला आहे.

बातम्या आणखी आहेत...