आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Meeting Update; Coronavirus Vaccine News | PM Modi To Meet Vaccine Manufacturers As Vaccine For All Above 18 Starting May 1

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांची फार्मा कंपन्यांसोबत बैठक:आज सायंकाळी 6 वाजता आयोजित बैठकीत व्हॅक्सीनचे उत्पादन वाढवण्यावर होऊ शकते चर्चा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फार्मसी ऑफ वर्ल्ड बनला भारत- मोदी

देशातील वाढत्या कोरोना संसर्गादरम्यान पंतप्रधान नरेंद्र आज सायंकाळी 6 वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे व्हॅक्सीन निर्मात्यांसोबत बैठक घेणार आहेत. यात व्हॅक्सीनचे उत्पादन वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकते. यापूर्वी, त्यांनी फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीच्या प्रमुखांसोबत सोमवारी बातचीत केली होती. त्यात मोदींनी अशा महामारीच्या काळात औषधांच्या निर्मितींचे कौतुक केले होते.

फार्मसी ऑफ वर्ल्ड बनला भारत- मोदी
मोदी म्हणाले की, औषध निर्मात्यांच्या कामामुळेच आज भारताला फार्मसी ऑफ वर्ल्डची ओळख मिळाली आहे. महामारीदरम्यान जगभरातील 150 पेक्षा जास्त देशांमध्ये आपण महत्वाची औषधे पुरवली. आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय औषध उद्योगाच्या निर्यातीत 18% वाढ झाली.२

मोदींनी डॉक्टरांची चर्चा केली होती

यापूर्वी सोमवारी व्हर्चुअल मीटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील डॉक्टरांचे कौतुक केले होते. ते म्हणाले की, मागच्या वर्षी डॉक्टरांच्या कठीण परिश्रमामुळेच आपण कोरोनासारख्या संकटावर मात केली. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आताही डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी या लाटेचा सामना करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...