आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Meeting Update; Lockdown News | Coronavirus Vaccine Situation Today Latest News And Live Updates

कोरोनावर मोदी यांचा मंत्र:ऑक्सिजन प्लांट वेगाने वाढवा; लस उत्पादनासाठी पुर्ण क्षमतेने काम करा - पंतप्रधान मोदी यांचे निर्देश

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी यांनी देशात सध्या उपलब्ध बेड्स, व्हेंटिलेटर आदीबाबत आढावा घेत त्याची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सक्रीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवार रोजी एक महत्वाची बैठक बोलावली. ही बैठक शनिवारी रात्री आठ वाजता सुरु झाली होती. यामध्ये केंद्र सरकारातील विविध मंत्री आणि मोठ-मोठ्या आधिकाऱ्यांचा समावेश होता.

पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत देशातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या वर्षी जसे आपण कोरोना महामारीला पराभूत केले होते. अगदी तसेच यावर्षी ही आपण सर्वांनी मिळून कोरोनाला हरवायचे आहे. दरम्यान, लोकांच्या गरजा लक्षात घेता स्‍थानिक प्रशासन अधिक सक्रीय आणि संवेदनशील असायले हवे. कारण त्यामुळे आपल्याला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल.

पंतप्रधान मोदी यांनी देशात ऑक्सिजन प्लांट आणि लस उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची सुचना दिली. यासोबतच देशात सध्या तुटवडा असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि अन्य औषधांची पुरवठ्याबाबतचा आढावा घेतला.

टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही
बैठकीमध्ये मोदी यांनी देशात सध्या उपलब्ध बेड्स, व्हेंटिलेटर आदीबाबत आढावा घेत त्याची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले. ते पुढे बोलताना म्हणाले की, देशात सध्या लसीकरणासोबतच चाचणी, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट योग्य पर्याय असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...