आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi News: Prime Minister Narendra Modi To Address Digital Conclave Today Latest News Updates

वर्ल्ड यूथ स्किल्स डे:पंतप्रधान मोदी म्हणाले - देशातील तरुणांना जगाच्या गरजांविषयी सांगत आहोत, लहान आणि मोठे प्रत्येक कौशल्य स्वावलंबी भारताची एक मोठी शक्ती बनेल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताच्या वर्कफोर्समध्ये केवळ 2.3% लोक असे आहेत ज्यांच्याजवळ एखादे जॉब स्किल आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने डिजिटल कॉन्क्लेवला संबोधित केले. ते म्हणाले की, देशातील तरुणांना जगाच्या गरजांविषयी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लहान आणि मोठे प्रत्येक कौशल्य स्वावलंबी भारताची एक मोठी शक्ती बनेल. यशस्वी व्यक्तीचे एकमात्र चिन्ह म्हणजे तो आपले कौशल्य वाढविण्यासाठी नवीन संधी शोधत राहतो. काहीही शिकण्याची तीव्र इच्छा नसेल तर आयुष्य थांबून जाते. 

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

1. स्किल इज सेल्फ रिलायन्स

यशस्वी व्यक्तीचे एकमात्र चिन्ह म्हणजे आपले कौशल्य वाढविण्याची कोणतीही संधी सोडू नका, त्याऐवजी नवीन संधी शोधत राहा. काहीही शिकण्याची तीव्र इच्छा नसेल तर आयुष्य थांबते. कौशल्याचे आकर्षण हे जगण्याची शक्ती देते, उत्साह देते. कौशल्य हे केवळ उपजीविका आणि पैशाचे स्रोत नाही तर जीवनात उमंग आणि उत्साहासाठी देखील आवश्यक आहे. 

2. कौशल्याच्या ताकदीची जाणीव झाली 

मी तरुण वयात आदिवासी पट्ट्यात स्वयंसेवक म्हणून काम करायचो. एकदा एका संस्थेसह कामावर जायचे होते, परंतु कार चालू शखली नाही. मेकॅनिकला फोन केला, त्याने 2 मिनिटात गाडी ठीक केली. त्याने 20 रुपये मागितले. एका साथीदाराने सांगितले की तुम्ही 2 मिनिटांच्या कामासाठी 20 रुपये घेत आहात. मेकॅनिक म्हणाला - 2 मिनिटांसाठी 20 रुपये नाही, परंतु मी 20 वर्षांपासून कामाद्वारे गोळा केलेल्या कौशल्याची किंमत घेत आहे. ही कौशल्याची शक्ती आहे.

3. कौशल्य असेल तर मेहनत वाचवता येते 

आपण पुस्तकांमध्ये वाचू शकता, यू-ट्यूबवर पाहू शकतो की, सायकल कशी चालवता. हे सर्व ज्ञान आहे, परंतु हे ज्ञान असणे आपल्याला सायकल चालविण्यास सक्षम बनवित नाही. परंतु, आपल्याकडे कौशल्य असल्यास आपण सायकल आवश्य चालवू शकतो. तुम्ही ही कला शिकली तर तुम्हाला जास्त डोके लावायची गरज पडणार नाही. आज भारतातील ज्ञान आणि कौशल्य यातील फरक समजून घेऊन कार्य समजून घेतले जात आहे. स्किल इंडिया मिशनची सुरुवात 5 वर्षांपूर्वी याच दिवशी झाली होती.

भारतातील फक्त 2.3% लोकांकडे नोकरीची कौशल्ये आहेत
15 जुलै रोजी दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता प्राप्त, हा कार्यक्रम कौशल्याच्या माध्यमातून तरुणांना स्किलच्या माध्यमातून रोजगार आणि आंत्रप्रेन्योरशिपवर जोर दिला जातो. त्याच वेळी, वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कौशल्याचे महत्त्व यावर फोकस केला जातो. भारतातील केवळ २.3% कामगारांकडे रोजगाराचे कौशल्य आहे.

बातम्या आणखी आहेत...