आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले - मी जनतेचा सेवक, माझी औकात काय?:काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री म्हणाले होते - या निवडणुकीत औकात दिसेल

अहमदाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. आज सुरेंद्रनगर येथील प्रचारसभेत त्यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले - 'मी तर जनतेचा सेवक आहे. माझी औकात काय?' मिस्त्रींनी नुकतेच एक वादग्रस्त विधान करत मोदींना त्यांची औकात दाखवण्याची भाषा केली होती.

तुम्ही माझी औकात दाखवा, मी सेवादार

पीएम मोदी म्हणाले, ''काँग्रेसचे नेते मोदींना औकात दाखवण्याची भाषा करतात. हा त्यांचा अहंकार आहे. तुम्ही राजघराण्यातील आहात. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझी काहीच औकात नाही. तुम्ही माझी औकात दाखवा. मी सेवादार आहे. सेवादाराची औकात नसते. तुम्ही मला नीच म्हणा. खालच्या जातीचा म्हणा. माझा मृत्यूचा व्यापारी म्हणून उल्लेख करा. माझी कोणतीच औकात नाही. पण कृपा करा विकासाच्या मुद्यावर बोला. विकसित गुजरात बनवण्यासाठी मैदानात या. औकातीचा खेळ सोडा.''

सुरेंद्रनगरमध्ये मधुसूदन मिस्त्रींवर टीका.
सुरेंद्रनगरमध्ये मधुसूदन मिस्त्रींवर टीका.

पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या भारत जोडो यात्रेवरही निशाणा साधला. ते म्हणाले - सत्तेतून बेदखल झालेल्या लोकांना यात्रेच्या माध्यमातून पुनरागमन करायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावरून राहुलवर निशाणा साधला. काँग्रेस नेते नर्मदा प्रकल्पाला 3 दशकांपर्यंत बंद ठेवणाऱ्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवून पदयात्रा काढत आहेत, असे ते म्हणाले.

मोदींनी राहुल गांधी व मेधा पाटकर यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली.
मोदींनी राहुल गांधी व मेधा पाटकर यांच्यावरही त्यांचे नाव न घेता टीका केली.

नवा अंदाज - नरेंद्रचा विक्रम भूपेंद्रने तोडावा ही इच्छा

यावेळी मोदींचा घरोघरी व वृद्धांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा नवा अंदाज पहावयास मिळाला. सभा संपल्यानंतर मोदींनी लोकांना घरातील वृद्धांना आपण आठवण काढल्याचे सांगण्याचे आवाहन केले. हे आवाहन त्यांनी रविवारी धोराजीच्या सभेतही केले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत नरेंद्रचा विक्रम भूपेंद्र भाईंनी मोडावा अशी इच्छाही व्यक्त केली.

धोराजीत म्हणाले - गुजरातमध्ये पूर्वी सायकलही तयार होत नव्हती. आता येथे विमान तयार होत आहेत.
धोराजीत म्हणाले - गुजरातमध्ये पूर्वी सायकलही तयार होत नव्हती. आता येथे विमान तयार होत आहेत.

अमरेतील जनतेच्या सेवेची आणखी एक संधी मागितली

पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या सोमनाथनंतर धोराजीतील प्रचारसभेला संबोधित केले. तिथे त्यांनी मतदारांना सेवा करण्याची आणखी एक संधी मागितली. ते म्हणाले - जनता व सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे संपूर्ण जगात गुजरातचा डंका वाजत आहे. या भागातील केवळ पाण्याच्या समस्येवर विचार केला तर भाजप सरकारने मागील 2 दशकांत किती काम केले हे दिसून येईल.

ते पुढे म्हणाले की, सरकार व जनतेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गुजरातच्या नावाचा संपूर्ण जगात डंका वाजत आहे. हे उद्ध्वस्त होता कामा नये. गुजरातमध्ये पूर्वी सायकलही तयार होत नव्हती. आता येथे विमान तयार होत आहेत. काही नेते देशात यात्रा करत आहेत. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना जनतेने राजकोटमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य का आहे हे विचारावे. काँग्रेसच्या राजवटीत हातपंप लावून हात वर केले जात होते, असे ते म्हणाले.

बोटादच्या सभेत पीएम मोदी.
बोटादच्या सभेत पीएम मोदी.

1 व 5 डिसेंबर रोजी मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही टप्प्यांतील मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होईल. पिल्या टप्प्यातील मतदानासाठी 5 नोव्हेंबर, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 10 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...