आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM म्हणाले- देशाचा खरा इतिहास दाबण्यात आला:परकीयांचा अजेंडा पुढे रेटण्याचे काम झाले; आमचा या चुका सुधारण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा खरा इतिहास दडवून ठेवल्याच्या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. देशात परकीयांचा अजेंडा पुढे रेटणारा इतिहास शिकवण्यात आला, असे ते म्हणालेत.

मोदी म्हणाले - भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. देशाच्या वीरांच्या अनेक कहाण्या आहेत. अशा लोकांविषयी काहीच सांगण्यात आले नाही. आता आम्ही यापूर्वी झालेल्या सर्वच चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत.

पंतप्रधान मोदी दिल्ली स्थित विज्ञान भवनात लचित बरफुकान यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सेनापती लचित यांच्या योगदानाचाही प्रामुख्याने उल्लेख केला.

हे छायाचित्र दिल्लीच्या विज्ञान भवनाचे आहे. येथे पंतप्रधान मोदींनी वीर लचित यांना आदरांजली वाहिली.
हे छायाचित्र दिल्लीच्या विज्ञान भवनाचे आहे. येथे पंतप्रधान मोदींनी वीर लचित यांना आदरांजली वाहिली.

मोदींनी सेनापती लचित यांच्या शौर्याचे केले कौतुक

PM म्हणाले की, वीर लचित सारख्या वीरांना जन्मास घालणाऱ्या आसामच्या धरतीला मी वंदन करतो. वीर लचित यांनी आपल्या आयुष्यात खूप धाडस व शौर्य दाखवले. आसामची माती याची साक्षीदार आहे.

ते पुढे म्हणाले की, कुणी तलवारीच्या ताकदीने आम्हाला झुकवण्याचा प्रयत्न केला, आमची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही त्याचे उत्तर देता येते.

PM मोदींनी वीर लचित यांच्या तैलचित्रापुढील दीप प्रज्वलित करून त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.
PM मोदींनी वीर लचित यांच्या तैलचित्रापुढील दीप प्रज्वलित करून त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.

सेनापती लचित म्हणजे दुसरे शिवाजी

लचित बरफुकन यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1622 रोजी झाला. ते अहोम साम्राज्याचे सुप्रसिद्ध सेनापती होते. लचित यांना ईशान्येतील छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी शिवाजी महाराजांसारख्याच रणनीतीने अनेकदा मोगलांचा पराभव केला होता. त्यांच्या या पराक्रमासाठी दरवर्षी आसाममध्ये 24 नोव्हेंबर रोजी लचित दिन साजरा केला जातो.

मोदींच्या महत्त्वाच्या गोष्टी...

1. कोणतेही नाते देशाहून मोठे नसते

PM मोदी म्हणाले की, सेनापती लचित यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देश सर्वोतपरी आहे. कोणतेही नाते देशाहून मोठे नसते.

2. देशाच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न

मोदी म्हणाले की, आपण वैयक्तिक नव्हे तर देशहिताला प्राधान्य द्यावा असा संदेश लचित याच्या जीवनातून मिळतो. सरकार इतिहासाच्या आघाडीवर झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. भूतकाळात याविषयी अनेक चुका झाल्या आहेत.

3. संस्कृती संरक्षण करणारा प्रत्येकजण योद्धा

परकीयांच्या आक्रमणापासून देशाची संस्कृती वाचवण्याचा मुद्दा येतो तेव्हा भारतातील सर्वच तरुण योद्धे होतात, असेही मोदी यावेळी म्हणाले.

शहा म्हणाले - इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे

गृहमंत्री अमित शहा यांनीही यावेळी इतिहासकारांना भारताच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले. यासंबंधी त्यांनी लेखकांच्या यासंबंधीच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले - भारताचा इतिहास योग्यपणे मांडण्यात आला नाही. तो चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला. आता तो दुरुस्ती करण्याची गरज आहे.

ICHRकडून इतिहासाचे पुनर्लेखन

भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन केले जाईल.

ICHRच्यावतीने हे काम सुरुही झाले आहे. याचा पहिला भाग मार्च 2023 मध्ये जारी केला जाईल. 100 हून अधिक इतिहासकार या प्रकल्पावर काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...