आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर मोदींची उच्चस्तरीय बैठक:पंतप्रधान म्हणाले - गावांमध्ये डोर-टू-डोर टेस्टिंग आणि ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करावी; व्हेंटिलेटर्सचा वापर होत नसल्याने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणाच्या वेगावरही झाली चर्चा

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी हायलेव्हल मीटिंग बोलावली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हाय पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या परीसरांमध्ये टेस्टिंग वाढवण्यात यावी. त्यांनी गावात कोरोनाची प्रकरणे वाढण्यावर चिंता व्यक्त केली. तसेच गावांमध्ये डोर-टू-डोर टेस्टिंग आणि सर्व्हिलान्सची व्यवस्था करावी. या व्यतिरिक्त त्यांनी व्हेंटिलेटर्सचा वापर होत नसल्यावरही नाराजी व्यक्त केली.

बैठकीदरम्यान सांगण्यात आले की, मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात जवळपास 50 लाख टेस्ट केले जात होते. जे एप्रिलमध्ये वाढून प्रत्येक आठवड्यात 1.3 कोटी टेस्ट करण्यात आले आहेत. या दरम्यान त्यांनी ग्रामीण परिसरांमध्ये ऑक्सिजनच्या योग्य पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी हे देखील म्हटले की, आरोग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणांना ऑपरेट करण्यासाठी ट्रेनिंग दिली जावी.

मीटिंगमध्ये पंतप्रधानांच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
1. ग्रामीण भागांमध्ये कोरोना पसरू देऊ नका

ग्रामीण भागात कोरोनाविरूद्ध लढा देण्यासाठी आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आशा आणि अंगणवाडी सेविकांना सबलीकृत करण्यावरही त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी ग्रामीण भागात होम आयसोलेशन आणि उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.

2. राज्यांना देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट व्हावे
पंतप्रधानांनी काही राज्यांमध्ये व्हेंटिलेटर योग्यप्रकारे न वापरल्याचे काही रिपोर्ट गांभीर्याने घेतले. केंद्र सरकारने पुरवलेल्या व्हेंटिलेटरच्या इंस्टॉलेशन व ऑपरेशनचे तातडीने ऑडिट करावे, असे त्यांनी निर्देश दिले.

3. गावांसाठी वितरण धोरण तयार केले जावे
पंतप्रधानांनी ग्रामीण भागात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी वितरण धोरण तयार केले जावे, असे निर्देश दिले. यामध्ये ऑक्सिजन कंसंट्रेटर्सलाही समाविष्ट केले जावे. वैद्यकीय उपकरणांच्या सुलभ ऑपरेशनसाठी वीजपुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

लसीकरणाच्या वेगावरही झाली चर्चा
या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी देशातील लसीकरणाच्या गतीबाबतही चर्चा झाली. बैठकीत पंतप्रधानांना सरकारच्या तयारीविषयी सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि निती आयोगासंबंधीत वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

संध्याकाळी ‘ताैक्ते’ चक्रीवादळ संदर्भात बैठक
याशिवाय ‘ताैक्ते’ चक्रीवादळाच्या संदर्भात पंतप्रधान संध्याकाळी 5 वाजता बैठक घेतील. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्यासह सरकारचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित राहतील. यामध्ये मदत व बचाव कार्याच्या तयारीबाबत चर्चा केली जाईल.

12 मे रोजीही झाली होती बैठक
तीन दिवसांपूर्वीच, 12 मे रोजी पंतप्रधान मोदींनी कोरोना संदर्भातील परिस्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्या बैठकीत कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसवरही चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...