आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi, PM Modi Meeting, COVID19 Related Situation And Vaccination, States Should Not Hide Statistics Of Patient's Death Narendra Modi

मोदींची उच्चस्तरीय बैठक:रुग्णसंख्येला घाबरून राज्यांनी आकडेवारी लपवू नये - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना, लसीकरण आढावा उच्चस्तरीय बैठकीत राज्य सरकारांना सल्ला

कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीमध्ये पारदर्शकता ठेवा. रुग्णसंख्या अधिक आहे म्हणून घाबरू नका. रुग्णसंख्या जास्त आहे म्हणजे तुमचे प्रयत्न कमी पडले असे होत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना धीराचा सल्ला दिला आहे. कोरोना परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.त्या वेळी ते बोलत होते. कोरोना चाचण्या आणि लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

ग्रामीण भागात घरोघरी चाचण्या करा
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक गावात घरोघरी चाचण्या करण्यावर भर देण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. साध्या-सोप्या भाषेत गृह अलगीकरण आणि उपचार प्रत्येक गावात जाऊन समजावून सांगा. ग्रामीण भागात सुरळीत ऑक्सिजन पुरवठा व्हावा या दृष्टीने वितरणाचे काम चाेख पद्धतीने झाले पाहिजे, असेही निर्देश नरेंद्र मोदी यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.

केंद्राने दिलेल्या व्हेंटिलेटरचे ऑडिट
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी यांनी व्हेंटिलेटर्सप्रकरणी काही राज्यांना कडक सूचना दिल्या आहेत. या राज्यांमध्ये केंद्राने पाठवलेली व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून आहेत. त्यांचा अद्याप वापरच झालेला नाही. ही व्हेंटिलेटर्स तत्काळ बसवून त्याचे ऑडिट करण्याचे आदेश मोदींनी दिले. गरज पडल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र,पंजाब,राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये पीएम केअर फंडातून पाठवलेली व्हेंटिलेटर्स खराब असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...