आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi | PMGKAY; PM Narendra Modi Will Interact With Beneficiaries Of Gujarat Via Video Conferencing Today; News And Live Updates

​​​​​​​पंतप्रधानांनी PMGKAY लाभार्थ्यांशी साधला संवाद:मोदी म्हणाले - यावर्षी सर्वात जास्त खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय केले, हा व्यवस्था पारदर्शक होण्याचा परिणाम

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी अन्न अनुदानावर 2.84 लाख केले खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे लोकांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. दिवाळीपर्यंत सर्व गरीब लोकांना मोफत अन्न धान्यांचे वाटप करण्यात येईल असे मोदी यांनी यावेळी सांगितले. बैठकीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, पूर्वीच्या तुलनेत सहजतेचे प्रमाण निश्चित केले गेले आहे. आता विकास खेडे आणि शहरापर्यंत पोहोचला आहे. ऑलिम्पिकमधील देशातील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीवर ते म्हणाले की, खेळाडूंनी हे प्रदर्शन 100 वर्षाच्या सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करताना ही कामगिरी केली. जेंव्हा व्यवस्थेत पारदर्शकपणा येतो ते तेंव्हा आत्मविश्वास वाढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षी अन्न अनुदानावर 2.84 लाख केले खर्च
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही अन्न सुरक्षा कल्याण योजना आहे. केंद्र सरकारने ही योजना गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरु केली होती. ही योजना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असून अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाद्वारे चालविली जाते.

  • कोरोना महामारीमध्ये 80 कोटी लोकांना 2 लाख कोटी रुपये खर्च करून मोफत रेशन देण्यात आले आहे.
  • गेल्या वर्षी 948 लाख मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात आले असून हे उर्वरित वर्षांच्या तुलनेत 50% अधिक होते.
  • 2020-21 दरम्यान अन्न अनुदानावर 2.84 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले.
  • गुजरातमधील सुमारे 3.3 कोटी लाभार्थ्यांना 25.5 लाख मेट्रिक टन अन्नधान्य मिळाले. अन्न अनुदानापैकी 5 हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात आले.
  • अनिवासी लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...