आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Politics; Assembly Election Results 2021 News | BJP Party Seats In West Bengal Assam Kerala Tamil Nadu Puducherry

मोदींसमोर नवे आव्हान:कोरोना संकटात सापडलेल्या मोदी सरकारला बंगालच्या निकालातून मिळाला नाही ऑक्सिजन, आता UP-उत्तराखंडमधून घ्यावी लागेल राजकीय लस

नवी दिल्ली(गौरव पांडेय)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबच्या निवडणुका

'खेला होबे...' हो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मोठा खेळ करुन दाखवला. राज्यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचे जवळ-जवळ निश्चित आहे. तर, कोरोना काळात देशातील परिस्थितीवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. फक्त विरोधकच नाही, तर पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक नेतेही पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती आहे. या परिस्थितीत पश्चिम बंगालमधील पराभव भाजपसाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखा आहे. बंगालमध्ये भाजपला मतदानरुपी ऑक्सीजन मिळाले नाही. पण, असममध्ये भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. त्यामुळे भाजप व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचला आहे.

आज आलेल्या निकालाचा मोदींच्या उंचीवर काही परिणाम पडेल ? यावर राजकीय विश्लेषक एस अनिल सांगतात की, भाजप आणि मोदींनी आपली संपूर्ण ताकत बंगालमध्ये लावली होती. असे वातावरण बनवले होते की, भाजप जिंक आहे. तरीदेखील तृणमूलचा विजय भाजपसाठी सेटबॅकपेक्षा कमी नाही. हो, ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पराभूत झाल्यावर भाजपला आनंदी होण्याची संधी नक्की मिळेल. दरम्यान, बंगालमधील पराभवामागे भाजपचा अतिविश्वास आहे.

बंगाल पूर्वोत्तर भारताचे सर्वात मोठे राज्य आहे. विधानसभा जागेंच्या बाबतीत उत्तर प्रदेशानंतर बंगाल आहे. त्यामुळे देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य जिंकणे भाजपसाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे होते. बंगालमध्ये विजय मिळाला असता, तर भाजपचा पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या उत्तर प्रेदश, उत्तराखंड आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत विश्वास वाढला असता. पण, बंगालच्या पराभवानंतर भाजपला येणाऱ्या निवडणुकांसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपला बंगालमध्ये विजयाचे ऑक्सिजन मिळाले नाही, पण देशात आपली उंची कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीतून राजकीय लस घ्यावी लागणार आहे.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश

देशातील सर्वात मोठे राजकीय राज्य उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहेत. भाजपने 2017 मध्ये राज्यात 312 जागा जिंकल्या होत्या. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी UP चे मोठे योगदान राहीले आहे. 2014 मध्ये NDA ने UP त 80 पैकी 73 आणि 2019 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर भाजपचे भवितव्य ठरू शकते.

उत्तराखंडमध्ये 2022 ला निवडणूक

देवभूमी उत्तराखंडमध्ये भाजपसाठी परिस्थिती आता सामान्य राहिली नाही. भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 57 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. तरीदेखील पक्षाला मध्येच आपला मुख्यमंत्री बदलावा लागला. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांना राज्याचा मुख्यमंत्री बनवण्यात आले. 2019 मध्ये भाजपने राज्यातील सर्व लोकसभा जागा जिंकल्या आहेत. तरीदेखील, 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबला जिंकणे अवघड

पंजाबमध्ये UP आणि उत्तराखंडसोबतच पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. येथे भाजप नेहमी अकाली दलासोबत निवडणूक लढत होती. पण, शेतकरी आंदोलनावरुन अकाली दलाने भाजपची साथ सोडली . अशा परिस्थितीत पंजाबमध्ये विजय मिळवणे भाजपसाठी सोपे नसणार.

बातम्या आणखी आहेत...