आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Popularity | Global Leader Approval Ratings 2022, List Of Most Popular World Leaders

पुन्हा टॉपवर मोदी:13 वर्ल्ड लीडर्सच्या सर्व्हे लिस्टमध्ये 71% रेटिंगसह नंबर-1 राहिले भारतीय पंतप्रधान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना 43% रेटिंग

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका सर्वेक्षणादरम्यान ग्लोबल वर्ल्ड लीडर्स लिस्टमध्ये पंतप्रधान मोदींची प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यादीत पंतप्रधानांना 71% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे, तर त्यांच्यासह इतर जागतिक नेते रेटिंगच्या बाबतीत खूपच मागे आहेत. हे रेटिंग मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केले आहे.

अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रप्रमुख खूप मागे राहिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली आणि विकसित देशांच्या प्रमुखांनाही मागे टाकले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना 43% रेटिंग मिळाले असून ते 6 व्या क्रमांकावर आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनाही 43% रेटिंग पॉइंट मिळाले आहेत, परंतु त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनंतर स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष, तिसऱ्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादार आहेत, ज्यांना 66% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे, ज्यांना 60% रेटिंग मिळाले आहे.

नोव्हेंबरमध्येही नरेंद्र मोदी आघाडीवर होते
याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेच्या यादीत इतर नेत्यांना मागे टाकले आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्येही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या सर्वेक्षणात प्रथम क्रमांकावर निवड झाली होती.

मोदींचे रेटिंग 2020 च्या तुलनेत अजूनही कमी आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी सर्वात जास्त अप्रूव्हल रेटिंग मिळवण्यात पहिल्या क्रमांकावर असले तरी, 2020 च्या तुलनेत त्यांचे रेटिंग अजूनही खाली आले आहे. मॉर्निंग कन्सल्टने त्यांच्या मे 2020 च्या अहवालात पंतप्रधान मोदींना 84% ची मान्यता दिली, तर वेबसाइटने मे 2021 मध्ये त्यांचे रेटिंग 63% पर्यंत खाली आणले.

मॉर्निंग कन्सल्ट कोण आहे आणि ते कसे कार्य करते?
मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स ग्लोबल लेव्हलवर गव्हर्नमेंट लीडर्सची अप्रूव्हल रेटिंग्स आणि कंट्री ट्रेजेक्ट्रीजला ट्रॅक करण्याचे काम करते. ही 13 देशांना ट्रॅक करत आहे, ज्यांच्यात ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मॅक्सिको, साउथ कोरिया, स्पेन आणि ब्रिटेनचा समावेश आहे.

13 ते 19 जानेवारी दरम्यान घेण्यात आली अप्रूव्हल रेटिंग्स
मॉर्निंग कन्सल्टनुसार, जागतिक नेत्यांसाठी लेटेस्ट अप्रूव्हल रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या 7-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर आधारित आहेत. यासाठी घेतलेल्या नमुन्याचा आकार प्रत्येक देशाच्या लोकसंख्येनुसार वेगवेगळा आहे.

बातम्या आणखी आहेत...