आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Punjab Visit; Charanjit Singh Channi Helicopter Not Allowed To Fly No Fly Zone | Marathi News |

मी मुख्यमंत्री आहे, दहशतवादी नाही:पंजाबमध्ये नरेंद्र मोदींमुळे दोनदा हेलिकॉप्टर थांबल्याने चन्नी संतापले; मोदी म्हणाले - मलाही थांबवण्यात आले होते

चंडीगढ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या हेलिकॉप्टरवरुन राजकीय वातावरण तापले आहे. आज चरणजीत चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला चंडीगढ़ आणि सुजानपुरहून उड्डाण भरल्यास रोखण्यास आले. मुख्यमंत्री चन्नी जालंधर दौऱ्यावर जात असताना, त्यांच्या हेलिकॉप्टरला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. चन्नी ज्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत होते त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचार सभा होती. त्यामुळे त्यांना रोखण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. दरम्यान हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखून धरल्याने चरणजीत चन्नी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, 'राजकीय कारणांसाठी मला प्रचाराची परवानगी दिली जात नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, दहशतवादी नाही.' असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत.

जालंधरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले होते, तेव्हा पठाणकोटहून हिमाचलला प्रचारासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले होते. पुढे मोदी म्हणाले की, "तेव्हा काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) अमृतसरमध्ये कुठेतरी येत होते. मग त्यांच्यामुळे माझे हेलिकॉप्टर उडू दिले नाही. यामुळे मला हिमाचल प्रदेशातील दोन रॅली रद्द कराव्या लागल्या होत्या. राहुल गांधींना सत्तेचा खूप अभिमान होता. असे भाष्य मोदी यांनी केले.

भाजप नेते म्हणाले पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राजकारण नको
मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला रोखल्यानंतर भाजप नेत्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण थांबवण्यात आले आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राजकारण करू नये. हेलिकॉप्टर उड्डाण रोखण्यात आल्याने अखेर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना चारचाकीने रस्त्याने जावे लागले.

मोदी म्हणाले- 2014 मध्ये राहुल गांधींमुळे माझे हेलिकॉप्टर उडू दिले गेले नाही. त्यांना सत्तेचा खूप अभिमान होता.
मोदी म्हणाले- 2014 मध्ये राहुल गांधींमुळे माझे हेलिकॉप्टर उडू दिले गेले नाही. त्यांना सत्तेचा खूप अभिमान होता.

सकाळी चंदीगडमध्ये हेलिकॉप्टर थांबवण्यात आले
सोमवारी सकाळी चन्नी हेलिकॉप्टरने होशियारपूरला जाणार होते, तिथे ते राहुल गांधींच्या सभेला उपस्थित राहणार होते. त्यासाठी त्यांना चंदीगडहून विमानाने जायचे होते. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पंजाबमध्ये नो-फ्लाय झोन तयार करण्यात आला, त्यामुळे चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली नाही. सुमारे तासभर हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर त्यांना घरी परतावे लागले. सीएम चन्नी म्हणाले की, त्यांना 11 वाजता परवानगी मिळाली होती, पण शेवटच्या वेळी ती नाकारण्यात आली.

पहिल्याच दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित
याआधी 5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा समोर आला होता. फिरोजपूरमध्ये त्यांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावर उभा होता. त्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याची चौकशी करत आहे. आता पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...