आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Sasaram Rally Live Update; Bihar Election 2020 | Here's Bihar (Vidhan Sabha) Assembly Election 2020 Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निवडणुकांत काश्मिर मुद्दा:पहिल्या निवडणूक सभेत मोदी म्हणाले - विरोधकांना काश्मिरात पुन्हा 370 आणायचे आहे, हा बिहारचा अपमान नाही का?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'तुम्ही त्यांना विश्वासासह सत्ता दिली होती. मात्र त्यांनी याला कमाईचे साधन बनवले, मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सासाराममध्ये बिहार निवडणुकीची आपली पहिली सभा घेतली. त्यांनी म्हटले की, 'हे लोक म्हणत आहेत की, सत्तेत आलो तर कलम 370 पुन्हा आणू. असे म्हणत ते बिहारच्या लोकांना मत मागण्याची हिंमत करत आहे. हा बिहारच्या लोकांचा अपमान नाही का? हे लोक कुणाचीही मदत घेवो, पण देश आपल्या निर्णयावरुन मागे हटणार नाही.'

मोदी म्हणाले, 'तुम्ही त्यांना विश्वासासह सत्ता दिली होती. मात्र त्यांनी याला कमाईचे साधन बनवले. त्यांना सत्तेवरुन बेदखल करण्यात आले तर त्यांच्यात विष निर्माण झाले. 10 वर्षांपर्यंत यूपीएच्या सरकारमध्ये राहत बिहारवर राग काढला. हे लोक बिहारच्या प्रत्येक योजनेला लटवत आणि भटकवणार आहेत. 15 वर्षे आपल्या सत्तेत त्यांनी बिहारला लुटले आहे.'

पुढे मोदी म्हणाले की, बिहारचे लोक कधीच कन्फ्यूजनमध्ये नसतात. निवडणुकीच्या एवढ्या दिवसांपूर्वीच आपला स्पष्ट संदेश देत आहेत. आतापर्यंत जेवढे रिपोर्ट येत आहेत, त्यामध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्ते येणार असे सांगितले जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने येथे ज्याप्रकारे काम केले, त्याचे परिणाम आता दिसत आहेत.

जगातील श्रीमंत देशांची परिस्थिती कुणापासूनही लपलेली नाही. जर बिहारमध्ये तेजीने कामे झाली नसती तर आज येथेही अनेक लोकांचा मृत्यू झाला असता. किती हाहाकार माजला असता याची कल्पना न केलेली बरी. मात्र बिहार सर्व सावधिगिरींचे पालन करत लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहे'