आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi: Shikshak Parv 2021 Update | PM Narendra Modi Addresses Teachers And Students Today

राष्ट्रीय शिक्षक पर्व:सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढवण्यात सर्वांनी योगदान द्यावे, खासगी क्षेत्रांनीही घ्यावा पुढाकार; पीएम मोदींचे आवाहन

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन योजना शिक्षण जागतिक स्तरावर नेतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शिक्षक पर्वाला सुरुवात केली. 7 सप्टेंबरला सुरू झालेला हा कार्यक्रम 17 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कार्यक्रमात वर्चुअली उपस्थित राहून मोदींनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, सर्व शिक्षकांनी देशातील शिक्षणात कठीण काळात, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अतुलनीय योगदान दिले आहे.

ते म्हणाले की, शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला आपले काम करावे लागेल. यासाठी आपल्या खाजगी क्षेत्रालाही पुढे यावे लागेल. मोदी म्हणाले की, शिक्षकांच्या पर्वावर नवीन योजना सुरू केल्या आहेत. हे उपक्रम देखील महत्त्वाचे आहेत कारण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि स्वातंत्र्याच्या 100 वर्षांनंतर भारत कसा असेल यासाठी नवीन संकल्प घेत आहे.

नवीन योजना शिक्षण जागतिक स्तरावर नेतील
पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज विद्यांजली 2.0, निष्ठा 3.0, टॉकिंग बुक्स आणि ULD बेस ISL डिक्शनरी यासारखे नवीन कार्यक्रम आणि प्रणाली सुरू करण्यात आल्या आहेत. मला खात्री आहे की त्याचा आपल्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर फायदा होईल. राष्ट्रीय शिक्षण आराखडा (NEP) तयार करण्यापासून ते त्याच्या अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक स्तरावर शिक्षक आणि तज्ञांचे योगदान राहिले आहे

जेव्हा समाज एकत्र काहीतरी करतो, तेव्हा त्याचे परिणाम नक्कीच मिळतात
ते म्हणाले की, आता आपण हा सहभाग एका नवीन स्तरावर नेला पाहिजे, आपल्याला त्यात समाजाचाही समावेश करावा लागेल. देशाने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वाससोबतच सबका प्रयासचा जो संकल्प घेतला आहे, विद्यांजली 2.0 त्यासाठी एक प्लॅटफॉर्म प्रमाणे आहे. जेव्हा समाज एकत्र काहीतरी करतो, तेव्हा चांगले परिणाम नक्कीच मिळतात. तुम्ही पाहिले आहे की गेल्या काही वर्षांमध्ये लोकसहभाग पुन्हा भारताचे नॅशनल कॅरेक्टर बनत आहे.

अनेक गोष्टी घडल्या ज्याची कल्पनाही नव्हती
मोदी म्हणाले की, गेल्या 6-7 वर्षांमध्ये लोकसहभागाच्या शक्तीमुळे भारतात अशा गोष्टी केल्या गेल्या आहेत, ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. राष्ट्रीय डिजिटल शिक्षण आर्किटेक्चर (N-DEAR) देखील शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.

बातम्या आणखी आहेत...