आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BJP चा 44 वा स्थापना दिन:PM नरेंद्र मोदी म्हणाले - भाजप हनुमानाच्या 'कॅन डू' वृत्तीप्रमाणे वागतो, सर्वांना मदत करतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचा आज 44 वा स्थापना दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, 'आजपर्यंत ज्या महान व्यक्तींनी पक्षाला सावरले, समृद्धव सशक्त केले, ते कार्यकर्ते व नेत्यांना माझे वंदन.' 43 वर्षांपूर्वी 6 एप्रलि 1980 रोजी भाजपची स्थापन झाली होती.

ते म्हणाले, 'आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानजींची जयंती साजरी करत आहोत. बजरंगबलीच्या नावाचा सर्वत्र जयघोष होत आहे. हनुमानजींचे जीवन व घटना आजही आपल्याला भारताच्या विकास यात्रेत प्रेरणा देतात. आपल्या यशामध्ये महान शक्तीचे आशीर्वाद प्रतिबिंबित होतात.'

मोदींच्या भाषणातील 8 मोठ्या गोष्टी, म्हणाले - भाजपला हनुमानापासून प्रेरणा

  • भारताला बजरंगबलीसारख्या स्वतःच्या सुप्त शक्तींची जाणीव : 'बजरंगबलीकडे अफाट शक्ती आहे. या शक्तीचा वापर ते त्यांचा आत्मसंशय संपल्यानंतरच करू शकतात. 2014 पूर्वी भारतातही अशीच परिस्थिती होती. भारताला आता बजरंगबलीसारखी आपल्यातील सुप्त शक्तींची जाणीव झाली आहे. हनुमानाच्या याच गुणांपासून भाजप कार्यकर्ते व पक्ष प्रेरणा घेतात.
  • भाजपही 'कॅन डू' वृत्तीसारखे वागते : हनुमान सर्व काही करू शकतो. तो स्वःतासाठी नव्हे तर इतरांसाठी सर्वकाही करतो. आणखी एक प्रेरणा आहे. बजरंगबलीला राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते कठोर झाले. भ्रष्टाचार, घराणेशाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा भाजपही भारत मातेला मुक्त करण्याचा तसाच प्रयत्न करतो.
  • हनुमानाच्या संपूर्ण जीवनक्रम पाहिला तर, त्यांच्यातील कॅन डू अॅटीट्यूड व संकल्पशक्तीचा त्यांच्या प्रत्येक यशात मोठा वाटा असल्याचे दिसून येतो. जगात कोणते काम अवघड आहे, जे तुमच्याकडून होत नाही. हनुमान जमणार नाही, असे कोणतेही काम नाही. लक्ष्मण संकटात असताना हनुमानाने संजीवनी पर्वत आणला. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपकडूनही असेच प्रयत्न केले जात आहेत. ते यापुढेही सुरू राहतील. राम काज किन्हें बिनु मोहि कहां विश्राम.
  • अनेकांना भाजपचे काम पचत नाही : 'आमची थट्टा उडवूनही अपयशी ठरल्यामुळे साम्राज्यवादी मानसिकतेच्या लोकांचा द्वेष आणखी वाढला. दशकांपासून हिंसाचार झेलणारा काश्मीर व ईशान्येत शांततेचा सूर्य उगवेल, याचा त्यांनी विचारही केला नव्हता. कलम 370 इतिहासजमा होईल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. जे काम अनेक दशकांपर्यंत झाले नाही, ते भाजपने कसे केले, हे त्यांना पचत नाही.'
  • हताश लोक म्हणतात - मोदी तुझी कबर खोदणार : 'खोटेपणाने भरलेले हे लोक खोटे बोलत आहेत. आपल्या भ्रष्टाचार उघड होत असल्यामुळे ते निराश झालेत. एवढे निराश की त्यांना एकच मार्ग दिसत आहे. ते आता उघडपणे माझी कबर खोदण्याची भाषा करत आहेत. ते मला धमकी देत आहेत.
  • आज सर्वसामान्य नागरिक भाजपची ढाल : 'साम्राज्यवादी मानसिकता असलेल्या या लोकांना व पक्षांना एक गोष्ट कळत नाही. आज देशातील गरीब, सामान्य माणूस, तरुण, माता-भगिनी, शोषित-वंचित प्रत्येकजण भाजपच्या कमळाच्या रक्षणासाठी ढाल बनून उभा आहे. पण आमचा भर विकासावर, देशवासीयांच्या कल्याणावर आहे.'
  • एका श्वासात जेवढे बोलता येईल, तेवढे बोललो : मी आकडेवारी देत ​​राहतो. 15-20 दिवसांची गोष्ट सांगतो. जीएसटीनंतर एकाच आर्थिक वर्षात 18 लाख कोटी रुपयांचे संकलन, 16 लाख कोटींचा कर भरला गेला. यूपीआयच्या माध्यमातून 14 लाख कोटी रुपयांचा विक्रमी व्यवहार झाला. निर्यात 750 अब्जांच्या पुढे गेली. 16 हजार कोटींची संरक्षण निर्यात झाली. रेल्वे मालवाहतूक 1500 मेट्रिक टन पेक्षा जास्त झाली. या नोंदींवरून देशाची प्रगती किती वेगाने होत आहे हे दिसून येते. मी एका दमात जमेल तेवढे बोललो.
  • अतिआत्मविश्वासाला बळी पडू नका : भाजपला 21 व्या शतकातील भविष्याचा पक्ष बनवायचे आहे. त्यामुळे अतिआत्मविश्वासाला बळी पडू नका. 2024 मध्ये भाजपला कुणीही हरवू शकत नाही, असे लोक आताच सांगत आहेत. हे खरे आहे. पण भाजपचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सर्वच नागरिकाची मने जिंकायची आहेत. 80 च्या दशकापासून आपण लढत आलोत. त्याच तडफेने आपल्याला येणारी प्रत्येक निवडणूक लढवायची आहे.

स्थापना दिन ते आंबेडकर जयंती विशेष सप्ताह

जे पी नड्डा यांनी सकाळी दिल्ली स्थित भाजप मुख्यालयात पक्षाचे ध्वजारोहण केले.
जे पी नड्डा यांनी सकाळी दिल्ली स्थित भाजप मुख्यालयात पक्षाचे ध्वजारोहण केले.

तत्पूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सकाळी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पक्षाचे ध्वजारोहण केले. लखनऊमध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण केले.

भाजप आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 14 एप्रिलपर्यंत विशेष सप्ताह म्हणून साजरी करणार आहे. पक्षाने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना यासंबंधी 11 एप्रिलला समाजसुधारक ज्योतीबा फुले व 4 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांची जयंती सर्व बूथ, मंडल, जिल्हा व राज्य कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश दिलेत.