आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन (PM-DHM) लाँच केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू करण्यात आली. या प्रमुख योजनेचा उद्देश देशभरातील आरोग्यसेवा डिजिटल करणे आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाचा एक यूनीक आरोग्य ओळखपत्र तयार केले जाईल, जेणेकरून देशव्यापी डिजिटल आरोग्य इको-सिस्टीम तयार करता येईल.
पूर्वी ते नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) नावाने चालत होते. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्ट 2020 रोजी अंदमान-निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमणदिव, लडाख आणि लक्षद्वीप येथे लाँच केले होते. ते आता देशभरात सुरू झाले आहे.
रेशनपासून प्रशासनापर्यंत सर्व काही डिजिटल झाले
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, डिजिटल इंडिया मोहिमेमुळे देशातील सामान्य नागरिकाची शक्ती वाढली आहे. आपल्या देशात 130 कोटी आधार क्रमांक, 118 कोटी मोबाइल यूजर, 80 कोटी इंटरनेट यूजर आणि 43 कोटी जन धन बँक खाती आहेत, जी जगात कुठेही नाही. आज रेशनपासून प्रशासनापर्यंत सर्व काही डिजिटल झाले आहे.
ते म्हणाले की, आरोग्य सेतू अॅपने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत केली, तसेच देशातील प्रत्येकाला मोफत लस दिली जात आहे. आतापर्यंत 90 कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि यामध्ये कोविन अॅपची मोठी भूमिका आहे.
2 कोटी लोकांनी आयुष्मान योजनेचा लाभ घेतला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आतापर्यंत देशातील दोन कोटी लोकांना आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाले आहेत. ते म्हणाले की पूर्वी अनेक गरीब लोक होते जे रुग्णालयात जाणे टाळत होते, परंतु आयुष्मान भारत योजनेमुळे त्यांची भीती दूर झाली आहे.
उपचार सर्वांसाठी उपलब्ध असावेत
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता भारतात अशा आरोग्य मॉडेलवर काम सुरू आहे, जे सर्वसमावेशक आहे. असे असे मॉडल, ज्यामध्ये आजारांपासून बचाव होईल, म्हणजेच प्रिव्हेंटिव हेल्थ केअर, आजारी असल्यावर सुलभ उपचार व्हावेत, स्वस्त असावे आणि सर्वांसाठी सुलभ असावे.
भारताच्या आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणातही अभूतपूर्व सुधारणा होत आहेत. 7-8 वर्षांच्या तुलनेत आज देशात अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल मनुष्यबळ तयार केले जात आहे.
आरोग्य आणि पर्यटन यांचा मजबूत संबंध
पंतप्रधान मोदी म्हणाले की हा देखील एक योगायोग आहे की आजचा कार्यक्रम जागतिक पर्यटन दिनी आयोजित केला जात आहे. काहींना प्रश्न पडेल की आरोग्य सेवा कार्यक्रमाचा पर्यटनाशी काय संबंध आहे? परंतु आरोग्याचा पर्यटनाशी खूप मजबूत संबंध आहे, कारण जेव्हा आपली आरोग्य पायाभूत सुविधा एकात्मिक, मजबूत असते, तेव्हा त्याचा पर्यटन क्षेत्रावरही परिणाम होतो. कारण कोणत्याही व्यक्तीला आरोग्य सुविधा नसलेल्या देशात प्रवास करायला आवडणार नाही.
दूसऱ्या शहरात डेटा कसा मिळेल?
डेटा रुग्णालयात नाही, तर डेटा सेंटरमध्ये असेल, जो कार्डाच्या माध्यमातून पाहिला जाऊ शकले. असे समजा की, जर तुम्ही कुठे उपचार घेण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी आधार कार्ड सारखा महत्त्वाचा असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.