आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Speech Today । PM Modi On BJP Foundation Day, BJP's Sthapana Din 2022

भाजप स्थापनादिनी मोदींच्या निशाण्यावर विरोधक:म्हणाले- देशात आज दोन प्रकारचे राजकारण आहे, एक कुटुंब भक्तीचे आणि एक राष्ट्रभक्तीचे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष 6 एप्रिल रोजी आपला 42वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. तत्पूर्वी, पीएम मोदींनी सोशल मीडियावर ट्विट केले आणि म्हटले की, ज्यांनी पक्ष बांधला आणि लोकांची अथक सेवा केली आम्ही अशा सर्वांची आठवण करतो.

संबोधनाच्या सुरुवातीला पंतप्रधान म्हणाले - आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. आज आपण स्कंद मातेची पूजा करतो. आपण त्यांना कमळाच्या सिंहासनावर बसलेले आणि दोन्ही हातात कमळ घेतलेले पाहिले आहे. त्यांचे आशीर्वाद भाजपच्या प्रत्येक नागरिकावर आणि कार्यकर्त्यावर राहोत, अशी प्रार्थना करतो.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे..

1. स्थापना दिन महत्त्वाचा असण्याची 3 कारणे सांगितली

स्थापना दिवस का महत्त्वाचा आहे याची तीन कारणे देत जनसंघापासून ते भाजपपर्यंत पक्षाच्या उभारणीत ज्यांनी स्वत:ला समर्पित केले त्या महापुरुषांना मी प्रणाम करतो. आजचा स्थापना दिवस तीन कारणांसाठी महत्त्वाचा आहे. यावेळी आपण देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहोत. प्रेरणा घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. दुसरे- वेगाने बदलणारी जागतिक परिस्थिती. तिसरे- 4 राज्यांत भाजपचे डबल इंजिन सरकार आले. तीन दशकांनंतर राज्यसभेतील पक्षाच्या सदस्यांची संख्या 100 वर पोहोचली आहे.

2. अमृतकाळ भाजप कार्यकर्त्यांसाठी कर्तव्यकाळ आहे

पंतप्रधान म्हणाले, भाजपची जबाबदारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता देशाच्या स्वप्नांचा प्रतिनिधी आहे. या अमृत काळात भारताची विचारसरणी स्वावलंबनाची आहे. लोकलला ग्लोबलला बनवण्याची आहे. सामाजिक न्यायाची आहे. समरसतेची आहे. या संकल्पांना घेऊन विचाराच्या रूपात आमच्या पक्षाची स्थापना झाली. हा अमृत काळ आमच्या कार्यकर्त्यासाठी कर्तव्याचा काळ आहे. देशाच्या संकल्पाशी सतत जोडून राहून स्वतःला समर्पित केले पाहिजे.

3. आपल्याला मानवतावादी विचारांचा आग्रह धरणारा देश म्हणून पाहिले जातेय

पीएम म्हणाले, एक काळ असा होता की सरकार कुणाचेही आले, तरी देशाचे काही होणार नाही, असा लोकांचा विचार होता. निराशा होती. देश बदलत आहे हे देशातील प्रत्येक व्यक्ती अभिमानाने सांगत आहे. वेगाने पुढे जात आहे. आज जगासमोर एक भारत आहे, जो कोणत्याही भीती किंवा दबावाशिवाय आपल्या हितासाठी खंबीरपणे उभा आहे. जेव्हा संपूर्ण जग दोन विरुद्ध ध्रुवांमध्ये विभागले गेले आहे, तेव्हा भारताकडे मानवतेबद्दल ठामपणे बोलणारा देश म्हणून पाहिले जात आहे.

4. आज देशाकडे निर्णय शक्ती आणि निर्धार शक्तीदेखील आहे

ते म्हणाले की, आपण ध्येय निश्चित करत आहोत आणि ती पूर्ण करत आहोत. काही काळापूर्वी, देशाने 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांचे निर्यात लक्ष्य पूर्ण केले आहे. कोरोनाच्या काळात हे लक्ष्य पूर्ण करणे भारताची क्षमता दर्शवते. भारत कोरोनाची लढाई संसाधनांच्या जोरावर लढत आहे, जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. आज भारत हा 180 कोटींहून अधिक लसींचा डोस देणारा देश आहे. अशा कठीण काळात भारत 80 कोटी गरिबांना मोफत रेशन देत आहे.

5. भाजपने व्होट बँकेच्या राजकारणाला टक्कर दिली

पंतप्रधान म्हणाले, आपल्या देशात अनेक दशकांपासून काही राजकीय पक्षांनी फक्त व्होट बँकेचे राजकारण केले आहे. मोजक्याच लोकांना आश्वासने द्या, बहुतांश लोकांना तरसत ठेवा, भेदभाव, भ्रष्टाचार... हे सगळे व्होट बँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम होते. या व्होट बँकेच्या राजकारणाला भाजपने स्पर्धा दिली असून आपले नुकसान देशाला समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले आहेत. भाजपच्या चांगल्या हेतूमुळे जनतेचे पूर्ण आशीर्वाद मिळत आहेत.

6. भाजपच्या विजयी टिळ्यासाठी माता-भगिनी पुढे येतात

पंतप्रधान म्हणाले, आज दलित, मागास, आदिवासी, शेतकरी, नवतरुणांसोबत ज्या तऱ्हेने महिला भाजपमध्ये मजबूतीने उभ्या आहेत, ही स्वत:तच नव्या युगाच्या ताकदीचे प्रतिबिंब आहे. भाजपच्या विजयात सर्वात पुढे माता-भगिनी येतात. हे निवडणुकीपुरते नसून सामाजिक आणि राष्ट्रीय प्रबोधन आहे, ज्याचे इतिहासात विश्लेषण केले जाईल. आम्ही महिलांमध्ये सुशासनाची आणि कठोर कायद्यांपासून संरक्षणाची भावना निर्माण केली आहे. आरोग्यापासून ते स्वयंपाकघरातील काळजी घेतली. स्त्रीशक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे, जो भारताला दिशा देत आहे. विकासात महिलांचा सहभाग वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.

7. आमच्यासाठी राजकारण आणि राष्ट्रवाद एकत्र चालत आहेत

पंतप्रधान म्हणाले, आमच्यासाठी राजकारण आणि राष्ट्रवाद एकत्र चालत आहेत. आम्ही राष्ट्रवाद राजकारणापासून वेगळे करणारे लोक नाहीत. देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे, हेही खरे आहे. एक म्हणजे कुटुंबाच्या भक्तीचे राजकारण आणि दुसरे राष्ट्रभक्तीचे. केंद्रीय स्तरावर, आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही राजकीय पक्ष आहेत, जे केवळ आणि केवळ आपापल्या कुटुंबाच्या हितासाठी काम करतात. कौटुंबिक सरकारांमध्ये, कुटुंबातील सदस्यांना स्थानिक संस्थेपासून संसदेपर्यंत अधिकार असतात. ते वेगवेगळ्या राज्यांत असू शकतात, परंतु ते कुटुंबवादाच्या तारांनी जोडलेले राहतात. एकमेकांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालत आहेत. या कौटुंबिक पक्षांनी देशातील तरुणांची प्रगतीही होऊ दिली नाही. त्यांचा नेहमीच विश्वासघात केला. आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की, आज भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो देशाला या आव्हानाची जाणीव करून देत आहे.

8. सरकारच्या प्रचाराचे सारथी भाजप कार्यकर्ते

पंतप्रधान म्हणाले, आज देश भूमीशी संबंधित सर्व मोहिमा पुढे नेत आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याचे सारथी आहात. अवघ्या काही दिवसांनी ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. पक्षातर्फे आजपासून सामाजिक न्याय पंधरवडा सुरू होत आहे. आपण या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा ही विनंती. सरकार जी योजना गरिबांसाठी चालवत आहे. देशवासीयांना त्यांची जाणीव करून द्या. एक कार्यकर्ता म्हणून पक्ष मला जो काही आदेश देईल, तो मी कार्यकर्ता म्हणून कामही करेन. तुमचा सहकारी म्हणून मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे.

ज्यांनी पक्षाची बांधणी केली आणि जनतेची अथक सेवा केली त्या सर्वांची आम्हाला आठवण आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
ज्यांनी पक्षाची बांधणी केली आणि जनतेची अथक सेवा केली त्या सर्वांची आम्हाला आठवण आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मंगळवारी भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते, सर्व खासदारांनी 14 दिवस समर्पित भावनेने सेवा करावी. यादरम्यान खासदार सरकारच्या कामगिरीची माहिती सांगतील.

दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झाली होती भाजपची स्थापना

6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर एका नवीन राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली. त्याचे नाव होते- भारतीय जनता पार्टी. आज या ऐतिहासिक घटनेला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. अटलबिहारी यांची पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

1980 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने जनता पक्षाला नाकारले. 1977 मध्ये 295 जागा जिंकणारा जनता पक्ष 3 वर्षानंतर केवळ 31 जागांवर आला. या पराभवाचे खापर पक्षातील जनसंघाशी संबंधित असलेल्यांवर फोडण्याचा प्रयत्न झाला.

4 एप्रिल रोजी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जनसंघाच्या माजी सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये अटल आणि अडवाणी यांचाही समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...