आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तेलंगणात पोहोचले. हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनी त्यांचे स्वागत केले. सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या 720 कोटी रुपये खर्चाच्या पुनर्विकास प्रकल्प आणि इतर रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली.
सिकंदराबाद रेल्वे स्थानकानंतर पंतप्रधान येथील परेड ग्राऊंडवर पोहोचले. ते येथे 5 राष्ट्रीय महामार्गांसह 13 हजार 360 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच एम्स बीबीनगरची देखील पायाभरणी PM मोदींनी केली. यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
PM मोदी म्हणाले- परिवारवाद असलेल्यांना सर्वच गोष्टींवर हवे नियंत्रण
पंतप्रधानांनी येथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. त्यांनी आधी विकास योजनांचा उल्लेख केला, नंतर पुढे भ्रष्टाचार आणि कुटुंबवादावर विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले - परिवारवाद असलेल्यांना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण हवे असते. त्यानंतर मोदींनी भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे परिवारवादी शक्तींचा रोष वाढला असल्याचे ते म्हणाले.
शक्तींचा रोष आहे.
14 महिन्यांत पंतप्रधानांचा 5 वा दौरा, प्रत्येक वेळी मुख्यमंत्री गैरहजर
पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) PM मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते नव्हते. ते पंतप्रधानांच्या कार्यक्रमातही जाणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या 14 महिन्यांतील हा पाचवा तेलंगणा दौरा आहे. पाच वेळा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव त्यांना घ्यायला आले नाहीत. केसीआर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दर्शविला.
बंदी संजय कुमारवरील कारवाईमुळे राजकारण तापले
दहावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार बंदी संजय कुमार यांना अटक केली त्यातच मौदींचा दौरा आला आहे. मंगळवारी उशिरा संजय यांना अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.
राज्यातील बीआरएस सरकारने पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच अटकेत असलेल्या संजय यांच्यावर जाणीवपूर्वक ही कारवाई केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची यापूर्वीच चौकशी केली होती.
7,850 कोटी निधीतून राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी
पंतप्रधान मोदी 7,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी करतील. हे रस्ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून जातील. त्यानंतर मोदी तामिळनाडूला रवाना होणार आहेत.
तामिळनाडूत चेन्नई विमानतळावरील नवीन टर्मिनलचे करणार उद्घाटन
दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई विमानतळावर पोहोचतील. जिथे ते नवीन टर्मिनलचे उद्घाटन करतील. त्यानंतर संध्याकाळी चेन्नई रेल्वे स्थानकावर ते चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
हे ही वाचा
दिव्य मराठी एक्सप्लेनर - आता देशात 11 वंदे भारत ट्रेन: पंतप्रधान मोदीच हिरवा झेंडा का दाखवतात?
या दोन तारखांच्या दरम्यान, 4 वर्षात देशभरात 11 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी 10 ट्रेनला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणखी पाच मार्गांवर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यांचे उद्घाटनही पीएम मोदी करणार असल्याचे मानले जात आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.