आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi To Holds Meeting With 54 Collectors From 10 States, To Discuss On Dealing With Corona

मोदींवर भडकल्या ममता:पंतप्रधानांनी बैठकीत कोणत्याच मुख्यमंत्र्याला बोलू दिले नाही, हा आमचा अपमान; पत्रकार परिषदेत ममतांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हर्चुअल बैठक घेतली. या बैठकीत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सामील झाल्या, पण त्यांच्या राज्याचा कुठलेही जिल्हाधिकारी सामील झाले नाही. मोदींच्या बैठकीनंतर ममतांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मोदींच्या बैठकीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, बैठकीत 10 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते, पण कुणालाच बोलू दिले नाही. हे अपमानजनक आहे.

येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल: मोदी

बैठकीत मोदी म्हणाले, 'कोरोनाची पहिली लाट असो किंवा ही दुसरी लाट असो. परिस्थिती पाहून बदल करणे, हे या महामारीने आपल्याला शिकवले आहे. हा व्हायरस म्यूटेंट होण्यात, रुप बदलण्यात तरबेज आहे. या व्हायरसशी सामना करण्यासाठी आपली पद्धत आणि स्ट्रेटजीदेखील वेगील असायला हवी. या दुसऱ्या लाटेत व्हायरसच्या नवीन म्यूटेंटमुळे तरुण आणि लहान मुलांमध्ये संसर्ग पसरण्याची भीती आहे. आपल्याला आता येणाऱ्या परिस्थितीसाठी तयार रहावे लागेल.

व्हॅक्सीनचे वेस्टेज थांबवावे लागेल

मोदी पुढे म्हणाले की, सध्या व्हॅक्सीन वेस्टेजवर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एक व्हॅक्सीन वेस्ट होणे म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीचा जीव धोक्यात घालणे. म्हणूनच व्हॅक्सीन वेस्टेज होण्यापासून रोखावे लागेल.

मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही फील्डवर केलेल्या कार्यातून, तुमच्या अनिभवांमधून आणि प्रतिक्रियेंमधून चांगल्या योजना बनवण्यात मदत मिळाली आहे. लसीकरणात अनेक राज्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्यांनुसार परिस्थिती आणखी सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुष्य वाचवण्यासोबतच आमची प्राथमिकता आयुष्य सोपे करण्यावर आहे.

या राज्यांचे जिल्हाधिकारी झाले होते सामील

पंतप्रधानांनी झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि पुडुचेरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यापूर्वी, PMO कडून मीटिंगबाबत राज्यांचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलिस महासंचालक (DGP) पत्र लिहून बैठकीबाबत सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...