आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi: Tokyo Olympics Hockey India | PM Narendra Modi Talks To Indian Women's Hockey Team Players

भावुक झाल्या भारताच्या लेकी:मोदींनी हॉकी संघाला फोन केला तर रडू लागल्या खेळाडू, PM मोदी म्हणाले - निराश होऊ नका, तुमच्या मेहनतीने हॉकीमध्ये प्राण आलेय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी तुमचा संघ आणि तुमच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन करतो. अजिबात निराश होऊ नका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकच्या कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनकडून हरलेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन दिले. सामना संपल्यानंतर पंतप्रधानांनी संपूर्ण टीमशी मोबाईलवर संवाद साधला. या दरम्यान सर्व मुली खूप भावूक झाल्या आणि रडू लागल्या. मोदींनी त्यांना रडू नका असे सांगितले, तुमच्या मेहनतीने देशाची हॉकी पुन्हा जिवंत झाली आहे असे म्हटले. पंतप्रधानांची महिला हॉकी संघासोबतची बातचित वाचा...

मोदी: तुम्ही सगळे खूप छान खेळलात. तुम्ही गेली 5-6 वर्षे खूप घाम गाळला, सर्व काही मागे टाकून तुम्ही ही साधना करत होता. तुमचा घाम पदक आणू शकला नाही, पण तुमचा घाम देशाच्या कोट्यवधी मुलींचा घाम बनला आहे. मी तुमचा संघ आणि तुमच्या प्रशिक्षकाचे अभिनंदन करतो. अजिबात निराश होऊ नका.

टीम : तुम्ही आम्हाला एवढे प्रोत्साहन दिले यासाठी धन्यवाद.
मोदी: मी पाहत होतो की, नवनीतच्या डोळ्यांना काही दुखापत झाली आहे. आता ठीक आहे ना. तिच्या डोळ्याला नुकसान तर पोहोचले नाही ना.
टीम : हो सर तिला 4 टाके पडले आहेत, आता सर्व ठिक आहे.

मोदी: वंदना आणि सर्वांनी उत्तम काम केले. सलीमाने तर... प्रत्येकाला वाटले की सलीमाने एक अद्भुत काम केले आहे. तुम्ही रडणे थांबवा. आवाज माझ्याकडे येत आहे. देशाला तुझा अभिमान आहे. अजिबात निराश होऊ नका. इतक्या दशकांनंतर हॉकी भारताची ओळख पुन्हा जिवंत होत आहे, ती तुमच्या मेहनतीमुळे.

मोदी: मी पाहिले आहे की तुमच्या प्रशिक्षकानेही त्यांचे सर्वोत्तम दिले आहे. तुम्ही मुलींना कसे प्रोत्साहन देत होता हे मी पाहत होतो. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा.

प्रशिक्षक: धन्यवाद सर. मुली सध्या खूप भावनिक आहेत. मी त्यांना सांगत आहे की त्यांनी देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांनी एक उत्तम काम केले आहे आणि त्यांनी ते साजरे केले पाहिजे. तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद सर.

मोदी : थँक यू, थँक यू.

पंतप्रधानांनी भारतीय पुरुष संघाचे अभिनंदन केले
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षांनंतर पदकांचा दुष्काळ संपवला. कर्णधार मनप्रीतच्या संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला. यानंतर, देशभरात उत्सव आणि अभिनंदनाची फेरी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विजयानंतर लगेचच टोकियोमध्ये उपस्थित संघाशी मोबाईलवर संवाद साधला. मोदी म्हणाले होते- मनप्रीतचे खूप-खूप अभिनंदन. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. तुम्ही एक अद्भुत काम केले आहे आणि संपूर्ण राष्ट्राला तुमचा अभिमान आहे. तरीही तुमचा आवाज खूप कमी येत आहे.

बातम्या आणखी आहेत...