आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi UP Election 2021 News | RSS's Decision PM Narendra Modi Will No Longer Be The Face In The Assembly Elections; News And Live Updates

संघाच्या बैठकीत ठरली रणनीती:यूपीच्या विधानसभा निवडणुकीत आता मोदींचा चेहरा नसणार, योगींच्या नेतृत्वात लढवली जाईल निवडणूक

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघाने घेतला पुढाकार, दत्तात्रेय होसबोल लखनऊमध्ये राहणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भाजपच्या यशासाठी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे. 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच महत्वाचा निर्णय म्हणजे आता पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत. यापूर्वी झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे म्हणने आहे.

संघाच्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पंतप्रधान मोदींचा चेहरा प्रादेशिक नेत्यांसमोर ठेवल्याने त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे संघाचे मत आहे. त्यामुळे मोदी यांची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी संघाची धडपड सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संघाने उत्तर प्रदेशची निवडणूक योगी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवार कुटुंबीयांना एकत्र आणण्याचीही चर्चा सुरु आहे.

बंगालमधील ममता विरुद्ध मोदींमुळे नुकसान

सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता विरुद्ध मोदींच्या रणनीतीमुळे भाजपला नुकसान झाल्याचे संघातील नेत्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकांबाबत गंभीर विचार आणि आढावा घेण्यात आला. ही बैठक दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोले यांच्या उपस्थितीत झाली.

या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरांवरील नेता समोर असल्याने राजकीय विरोधकांना मोठ्या प्रमाणावर टिका करायला संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे नुकसान झाले. कारण यापूर्वीही 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरोधात आणि नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्याविरूद्ध या रणनीतीचा फायदा झाला नाही.

उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मते निर्णायक
उत्तर प्रदेश राज्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनजी आणि काँग्रेसने मोदी यांना मुस्लिमविरोधी असल्याचे टॅग लावले. याचा फायदा तृणमूलला झाला.

यूपीमध्येही मुस्लिम मते निर्णायक असल्याने सुमारे 75 जागेंवर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात मोदी यांना समोर केल्यास त्यांचा फायदा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला घेऊ शकते.

योगींवर या कारणांमुळे विश्वास
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मुस्लिमविरोधी नसल्याचे बैठकीत सांगितले गेले. कारण योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूर येथील मंदिराचे महंत होते. त्यामुळे स्थानिक मुस्लिमांचे काहीही वाद झाल्यास ते मंदिरात येऊन सोडवायचे. गोरखपूर आणि आजूबाजूच्या मुस्लिम आणि मागासलेल्यांचा गोरखपूर मंदिरावर विश्वास आहे. त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात होणारी खिचडी जत्रेतील बहुतांश दुकाने मुस्लिम व्यावसायिकांची असतात. या कारणांमुळे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्धार संघाने केला आहे.

मोदी-योगी यांच्यात कोणताही वाद नाही
मोदी-योगी यांच्यात कोणताही वाद नसल्याचे आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ट्विटर खाते आणि इतर पोस्टरवरुन काही दिवसापूर्वी मोदींचा फोटो हटवण्यात आला होता. कारण उत्तर प्रदेशमध्ये योगी चेहरा असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे संघाच्या नेत्यांनी म्हटले. या दोन्ही नेत्यांना एकत्र काम करत प्रतिमा बळकट करण्यासाठी सांगितले गेले असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्याखेरीज आता उत्तर प्रदेशचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यूपीच्या पोस्टरवर दिसणार आहेत.

21 जूनपासून मोफत लसीकरण सुरु, हे आहेत कारणे
पंतप्रधान मोदी यांनी 21 जून रोजी योग दिवसाचे औचित्य साधत मोफत लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परंतु, हा दिवस भाजपसह संघासाठी महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी संघाचे संस्थापक आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची पुण्यतिथीही असते.

त्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी रेशन योजना दिवाळीपर्यंत सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. जेणेकरुन याचा संबंध विधानसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये. परंतु, विधानसभा निवडणुकीचे लक्ष्य ठेवून हे आणखी वाढवले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे यावर्षी डिसेंबरपर्यंत 200 कोटी लसी डोसचे नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघाने घेतला पुढाकार, दत्तात्रेय होसबोल लखनौमध्ये राहणार
दिल्लीत दोन चाललेल्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे एकच दिवस थांबले. या बैठकीत प्रांतिक मुख्यालयाचे प्रभारी व इतर जबाबदाऱ्याबाबतही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यासोबचत सहकार्यवाह दत्तात्रय होसबोल यांचे कार्यालय नागपूर ऐवजी आता लखनऊमध्ये असणार आहे.

माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्यात समन्वयाचे काम करतील आणि बहुधा ते दिल्लीतच राहतील. सरसंघचालक नागपुरमध्ये राहणार असून सहकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांना भोपाळ मुख्यालय देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...